the-elon-musk
the-elon-musk 
सप्तरंग

अवकाशझेप घेणारा अष्टावधानी...

जयप्रकाश झेंडे

‘पृथ्वीतलावरील सर्वांत धनवान व्यक्ती’ असं बिरूद ज्याच्या नावासमोर नुकतंच जोडलं गेलं, असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा उद्योजक म्हणजे एलॉन मस्क. त्याच्या जगावेगळ्या; पण प्रभावी कार्यपद्धतींवर आधारित हे पुस्तक. या पुस्तकात नेमकं आहे तरी काय?

टेस्ला, स्पेसएक्स, सोलरसिटी... अशा जागतिक उद्योगक्षेत्रातील अग्रणी कंपन्यांचा संस्थापक असलेला एलॉन मस्क.  त्याच्या कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करतात. त्याच्याबद्दलची इतकीच माहिती पुरेशी नाही. वेगळी उद्योजकीय दृष्टी कशी असावी, आपल्या कर्मचाऱ्यांकडून उत्तम काम करून घेण्याचं त्याच्यातलं  कौशल्य, चाकोरीबद्ध उद्दिष्टांची पायवाट  नाकारत मानवजातीच्या भविष्याला कलाटणी देण्याचा त्याचा प्रयत्न आणि आणखी कितीतरी सांगता येईल.

एलॉन मस्क हा अवलिया अलौकिक बुद्धिमत्तेचा धनी आहे हे वेगळं सांगायला नको; पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा ‘हटके’ दृष्टिकोन त्याला ‘अवकाशझेप’ घेण्यासाठी उपयुक्त ठरतो हे नक्की. पुनर्वापर करता येणार्‍या अवकाशयानाची निर्मिती करून त्यानं अंतराळात वस्ती उभारण्याच्या मानवी महत्त्वाकांक्षेला एकीकडे नवे पंख दिले तर दुसरीकडे ‘टेस्ला’ आणि सोलरसिटी अशा कंपन्यांच्या माध्यमातून वाहनं तसंच ऊर्जा क्षेत्राच्या प्रगतीला अनोखे आयाम दिले.

‘पेपाल’ या स्टार्टअपपासून सुरू केलेल्या प्रवासात तो नवी नवी शिखरं सर करतोय. गुणवत्तापूर्ण माणसाची पारख करत त्यांच्यासह अफाट गतीनं उद्दिष्टांकडं मार्गक्रमण करणं त्याला प्रचंड आवडतं. सतत एकाच पद्धतीच्या कामात गुंतून न राहता मग मस्क नवनवीन आव्हानांवर आरूढ होतो. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रातही त्याला रस आहे. हे क्षेत्र अवघ्या मानवजातीचं भविष्य असणार आहे याची त्याला कल्पना आहे. त्याच्या व्यक्तित्वामधले हे सारे पैलू या पुस्तकात उलगडण्यात आले आहेत. यश, प्रगती आणि अन्य बाबींकडे बघण्याचा एलॉनचा दृष्टिकोन पुस्तकाच्या पानापानातून दिसतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे पुस्तक कलात्मकदृष्ट्याही सरस आहे. मजकुराला पुरक छायाचित्रं एलॉनचा जवळून परिचय घडवतात. सुनीति काणे यांनी केलेला ओघवता अनुवाद हे पुस्तकाचं बलस्थान आहे. प्रगतीची आस बाळगणाऱ्यांनी संग्रही ठेवायला हवं असं हे पुस्तक सध्याच्या स्पर्धेच्या युगात अतिशय महत्त्वाचं आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT