daughter and father sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : ‘पप्पा, माझी जात कोणती?’

लेकानं असा प्रश्न विचारला आणि मोबाईल बाजूला ठेवून मी त्याच्याकडं बघितलं.

नितीन थोरात

लेकानं असा प्रश्न विचारला आणि मोबाईल बाजूला ठेवून मी त्याच्याकडं बघितलं.

लेकानं असा प्रश्न विचारला आणि मोबाईल बाजूला ठेवून मी त्याच्याकडं बघितलं.

‘तुला असा प्रश्न कसा पडला? आणि मुळात जात हा शब्द तुझ्या कानावर कसा पडला?’

मी असं विचारताच तो क्षणभर गडबडला. म्हणाला, ‘पिंटूदादा म्हणत होता आपण सगळ्यांनी एकाच जातीच्या मुलांना सोबत घेऊन क्रिकेटची टीम बनवायची.’ तसा मी चकित होत त्याला म्हणालो, ‘आणि हे लॉजिक पिंटूदादाच्या डोक्यात कुठून आलं?’

तसा तो म्हणाला, ‘पप्पा, आम्ही मॅच जिंकलो की सगळ्यांचे मम्मी-पप्पा आमचे कौतुक करतात. पण आम्ही हरलो तर एकमेकांच्या मुलाला नावं ठेवतात. मागच्या वेळी बंटीदादा लगेच आउट झाला, तर पिंटूदादाचे पप्पा म्हणले त्याला कशाला घेतलं टीममध्ये? तो दुसऱ्या जातीचा आहे.’

तसं मी चिंतातूर चेहऱ्यानं म्हणालो, ‘पण मग आता तुमी जर जात बघून टीममध्ये खेळाडू घेतले तर ज्याला खेळता येत नाही, त्यालाही घेणार का?’

तसा पोरगा नाराजीत म्हणाला, ‘हा, त्याला काय होतंय तेव्हा? जिंकलो तर कौतुक होईलच. पण हरलो तर कुणी आम्हाला ओरडणार तरी नाही ना? कारण आम्ही सगळे एकाच जातीचे असू.’

कपाळावर हात मारत म्हणलं, 'उद्या एका वर्गात एकाच जातीची मुलं बसवायची असंही तुम्ही म्हणाल. तेही चालेल का? तुला शिक्षकही तुझ्याच जातीचे हवेत. मुख्याध्यापकही तुझ्याच जातीचे हवेत. मित्रही तुझ्याच जातीचे हवेत. चालेल का हे सगळं ’

तसा हसत लेक म्हणला, ‘पप्पा ही आयडिया मस्त आहे. म्हणजे कुणी नापास झालं तरी त्याला त्याचे मम्मी पप्पा ओरडणार नाहीत. म्हणतील जाऊदे आपला मुलगा नापास झाला, तरी काय झालं? त्याला आपल्याच जातीच्या शिक्षकानं शिकवलं होतं आणि बाकीची पास झालेली मुलंही आपल्याच जातीची आहेत.’

लेकाच्या या उत्तरावर मात्र मला हसावं का रडावं तेच समजेना. डोकं सणकलं होतं, पण दुसऱ्याच क्षणाला स्वतःला शांत केलं. त्याला म्हणलं, ''बरं, मग ठिकाय, सांगतो तुला तुझी जात. पण प्रॉब्लेम हा आहे की माझी आणि तुझ्या मम्मीची पण जात वेगळी आहे. तुला कुणाची जात हवी?’

त्यावर लेक शांत झाला आणि म्हणाला, ‘जाऊद्या, मीच दुसरी टीम शोधतो.’

लहान लेकराचा असा सुज्ञपणा भलताच काळजाला टोचतो राव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT