Poonam Sakore writes Maher memories Love in the minds of women
Poonam Sakore writes Maher memories Love in the minds of women sakal
सप्तरंग

माझिया माहेरा : रसरशीत आठवणी

सकाळ वृत्तसेवा

माहेर म्हटलं, की महिलांच्या मनातील मायेचा एक हळवा कप्पा जागा होतो...

माहेर म्हटलं, की महिलांच्या मनातील मायेचा एक हळवा कप्पा जागा होतो. माझं माहेर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथलं बुरुंजवाडी गाव आहे; पण आई-वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही राजगुरुनगर इथं स्थायिक झालो. मोठ्या सुट्टीच्या कालावधीत जसं, की दिवाळी, उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सर्व जण- आई-वडील, मी, दोन बहिणी, भाऊ-वहिनी, सर्व जावई व नातवंडं मिळून गावाला; तसंच विविध ठिकाणी सहलींसाठी जात असतो. शेतातील हिरवागार भाजीपाला काढून त्याच्या गड्ड्या बांधणं हे आवडतं काम. कोथिंबीर काढणं, भुईमुगाच्या शेंगा काढणं ही कामं आम्ही अत्यंत आवडीनं करतो. सळसळत्या वाऱ्याच्या साथीनं हिरव्यागार गव्हाच्या शेतातून फिरणं, ज्वारीची कोवळी कणसं व हरभरा शेतात भाजून खाण्याची मजा काही औरच असते. हा नाश्ता झाल्यावर आम्ही शेतातील आंब्याच्या झाडावरील कैऱ्या दगडानं पाडतो. दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात शेतातल्या झाडाच्या सावलीत बसून चुलीवर केलेली साधीच; पण तितकीच चवदार व चविष्ट न्याहारीची सर आजकालच्या फास्ट फूडला अजिबात नाही.

आई-वडिलांचं तसंच भाऊ हर्षल व वहिनी तृप्ती यांचं आम्हा सर्व बहिणी व भाच्यांवर खूप प्रेम आहे. वडील आणि भाऊ हे सर्व बहिणींकडे दर महिन्याला भेट देतात. माहेरच्या प्रेमाचा व मायेचा वानवळा आम्हा सर्व बहिणींना भरभरून मिळतो. गावी जाताना रस्त्यांच्या दुतर्फा उसाची शेती आहे. त्यातील ऊस तोडून खाणं आणि चघळून त्याचा रस काढणं ही एक सुंदर पर्वणी असते. माझं सासर शिरूर तालुक्यातीलच केंदूर-पाबळ या गावचं आहे. त्यामुळे मुलांना दोन्हीकडील ग्रामीण जीवनाचा सुंदर अनुभव मिळतो, सुखी व सुंदर ग्रामीण जीवनाचा भाग होण्याची संधी त्यांना मिळते. गावी गेल्यावर आजी लाडक्या नातवाच्या तोंडावर हात फिरवून दृष्ट काढते. आजोबा पोहायला; तसंच शेतात फिरायला घेऊन जातात. आजी-आजोबांच्या सहवासात प्रचंड प्रेम व संस्कार या दोन्ही गोष्टी दडलेल्या असतात. आमची लाडकी वाहिनी तृप्ती आम्हा सर्वांमध्ये सर्वांत धाकटी; पण सुट्या व सणावाराला ती हक्कानं आम्हा सर्वांना माहेरी बोलावते. मुलांच्या; तसंच आमच्या आवडीचा नाश्ता; तसंच जेवण करण्यात ती गुंग होऊन जाते. हे सर्व ती तिचं ऑफिसचं ऑनलाइन काम सांभाळून करते.

आईस्क्रीम व विविध चॉकलेट्स, कॅडबरी यांनी फ्रीजचा कप्पा नेहमी भरलेला असतो. संध्याकाळी मुलांच्या आवडीचे विविध पदार्थ मामी करत असते. हे सारं भरलं गोकुळ पाहून आई-वडिलांना खूप आनंद होऊन त्यांचा उर अभिमानानं भरून येतो, त्यामुळे आम्हा सर्वांनाही खूप समाधान वाटतं.

माहेराविषयी कितीही बोललं तरी ते थोडंच. आम्हा सर्व बहिणींना माहेराप्रमाणंच प्रेमळ व मायाळू माणसांनी भरलेलं हसतं खेळतं गोकुळरूपी सासर मिळालं आहे. दोन्ही ठिकाणी नातवंडांचं कोडकौतुक होत असतं. असं हे माझं माहेर. आमच्या वहिनीबद्दल सांगायचं झालं, तर ती वहिनी कमी- आमची मैत्रीणच जास्त आहे. तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं, तर शब्द कमी पडतात. आम्हा माहेरवाशिणींसहित पैपाहुण्यांनादेखील आदरातिथ्य व आपुलकीनं तृप्त करणारी अशी ही तृप्ती आम्हा सर्वांची लाडकी आहे. माहेरचं सुख याहून वेगळं काय असतं? माहेर म्हणजे माहेरच असतं- नातवंडांसाठी ते आठवणीतील मामाचं गाव असतं.

- पूनम साकोरे-टेमगिरे, भोसरी, जि. पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT