Prachi Kulkarni writes blessings are important success story of sandhiprakash bhide  sakal
सप्तरंग

सरस्वतीचा आशीर्वाद महत्त्वाचा!

नोकरीतून बाहेर पडावं लागणं हे अनेकांसाठी निराशाजनक असतं. पुढे काय याची भीती मनात घर करून रहाते. पण, याचं संधीमध्ये रूपांतर करणं हे फार कमी लोकांना जमतं आणि त्या संधीतून समाजोपयोगी काम उभारणारे तर फारच थोडे.

सकाळ वृत्तसेवा

नोकरीतून बाहेर पडावं लागणं हे अनेकांसाठी निराशाजनक असतं. पुढे काय याची भीती मनात घर करून रहाते. पण, याचं संधीमध्ये रूपांतर करणं हे फार कमी लोकांना जमतं आणि त्या संधीतून समाजोपयोगी काम उभारणारे तर फारच थोडे.

- प्राची कुलकर्णी

नोकरीतून बाहेर पडावं लागणं हे अनेकांसाठी निराशाजनक असतं. पुढे काय याची भीती मनात घर करून रहाते. पण, याचं संधीमध्ये रूपांतर करणं हे फार कमी लोकांना जमतं आणि त्या संधीतून समाजोपयोगी काम उभारणारे तर फारच थोडे. पण हे सगळं जमवलेली व्यक्ती म्हणजे संधिप्रकाश भिडे. भिडेंचं लहानपण पुण्यातलं; पुण्यात पूर्वी खैबर नावाचं हॉटेल होतं, त्या परिसरात त्यांचं लहानपण गेलं. वडील ‘सीओईपी’मध्ये प्राध्यापक, आई घर चालवायची. घरात सगळ्यांनाच सगळी कामं करायची सवय आणि बंधनसुद्धा. स्त्री-पुरुष भेद भिडेंच्या घरात नव्हता. ‘‘मी लहानपणी घरी सर्व प्रकारची कामं करायचो. म्हणजे केर काढण्यापासून ते टॉयलेट, बाथरूम धुण्यापर्यंत सर्व कामं आम्ही करायचो. तेव्हाचं घरातलं वातावरणच नाही, तर देशातलं वातावरणही वेगळं होतं.’’ लहानपण असं असतानाच कुटुंबाला एक धक्का बसला. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या आईची दृष्टी गेली, त्यामुळे सगळं घरच जवळपास थांबलं.

अशातच भिडेंचं शिक्षण सुरू होतं. पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयात त्यांचं शिक्षण सुरू होतं. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. फर्ग्युसनमध्ये असताना महाविद्यालयातली दुर्बीण वापरून निरीक्षणं करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याच काळात त्यांनी चक्क एक कॉम्प्युटर डिझाइन केला. १ ते २० आकड्यांची बेरीज, वजाबाकी हा कॉम्प्युटर करायचा. पुढे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांना ‘इंटरनॅशनल कम्प्युटर लिमिटेड’मध्ये काम मिळालं. काही काळ इथे काम केलं; पण शिक्षणाची आस होती, त्यासाठी निधी जमवायचा तर मदत हवी. त्यासाठी त्यांनी बाहेरगावच्या असाईनमेंट करायला सुरुवात केली. त्यातून जे पैसे साठले, त्यातून परदेशी जाण्यासाठी तिकीट काढता आलं. मग वेगवेगळ्या विद्यापीठांकडे अर्ज केल्यावर अखेर व्योमिंग विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. इथलं पहिलं वर्ष खडतर असल्याचं भिडे सांगतात. ‘‘तयारी केलेली होती, तरीही अमेरिकन इंग्रजी समजायला अवघड होतं. त्यातून शिकणं आणि शिकवणं अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. मात्र वर्षभरातच सरावलो.’’

शिक्षण संपलं आणि ‘इंटेल’मध्ये नोकरीची संधीही चालून आली. जवळपास ५ वर्षं इथे काम केल्यानंतर त्यांनी दुसरी संधी शोधायचं ठरवलं. त्यानंतर १० वर्षं वेगवेगळी कामं केल्यानंतर त्यांनी इंटेलमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. २०१४च्या सुमारास त्यांना ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मध्ये नवं काही करण्याची कल्पना सुचली. त्यांनी अर्थातच आपल्या बॉसेसना सांगत त्यासाठी निधी देण्याची मागणी केली; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर मात्र त्यांनी एचआरला गाठलं. त्या एचआर मॅनेजरची सीईओंसोबत मीटिंग होणार होती. एचआरने त्यांना मिळालेला वेळ भिडेंना देत त्यांना प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं. भिडेंचं प्रेझेंटेशन झालं आणि पाठोपाठ फंड्ससुद्धा मिळाले. असे जवळपास ३ प्लॅटफॉर्म भिडेंनी सुरू केले. २०१६ मध्ये मात्र इंटेलने आपल्या वरिष्ठपदांवरच्या १२ हजार लोकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. भिडेंना यातही संधी दिसली. त्यांनी कंपनीतून बाहेर पडताना मिळालेल्या पॅकेजचे पैसे गुंतवले आणि त्यातून मिळालेल्या पैशांमधून नव्या स्टार्टअपची मुहूर्तमेढ रोवली.

‘फ्लिटनर्स’ नावाचा हा प्लॅटफॉर्म रुग्णालयांना नर्सेस पुरवण्याचं काम करतो. भिडेंच्या शब्दांत, ‘‘हे नर्सेससाठी उबर किंवा ओला प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या रुग्णालयात एखाद्या नर्सने सुट्टी घेतली, किंवा त्या रुग्णालयाला एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या नर्सची गरज आहे, तर मग त्या रुग्णालयाने त्यांची रिक्वायर्मेंट या ॲपवर पोस्ट करायची आणि मग त्या अनुभवाच्या किंवा त्या पद्धतीचं काम येणाऱ्या नर्सेस ते काम स्वीकारू शकतात आणि मग संबंधित रुग्णालयात त्यांच्या गरजेच्या तासांपुरतं काम करतात. याने कोणत्याही रुग्णालयाचं कसलंही काम अडून रहात नाही.’’

अर्थात, हे झालं व्यवसायाबद्दल. पण, आईच्या अनुभवामुळे पूर्वीपासूनच त्यांनी अंध, दृष्टिदोष असणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करायचं ठरवलं होतं. गाणं आणि संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांनी काही लोकांना एकत्र करत ‘सूरसप्तक’ नावाचा ग्रुप सुरू केला. त्यामाध्यमातून कार्यक्रम करायला सुरुवात केली. याच कार्यक्रमांमधून मिळालेल्या पैशांतून डोनेशन करत मुलांना चष्मे, त्यांची ऑपरेशन्स अशा गोष्टी करून त्यांना मदत करण्यासाठी ते प्रयत्न करतात. आता यासाठीदेखील ‘बालक दृष्टी’ नावाच्या एका स्टार्टअपला सुरुवात केली आहे. भिडे दृष्टीसाठी काम करतानाच दृष्टिकोन बदलायचाही सल्ला देतात. त्यांच्याच शब्दांत, ‘‘नोकरी करताना आपला फोकस हा मिळणाऱ्या पॅकेजमधून किती पैसे मिळणार याकडे असतो, त्याऐवजी आपल्या माध्यमातून काय निर्मिती होणार आहे, नवं काय घडवलं जाणार आहे, याचा विचार आपण करायला हवा. सरस्वतीचा वरदहस्त असला की लक्ष्मी आपोआप येतेच.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT