Shahi Mudra
Shahi Mudra Saptarang
सप्तरंग

उत्तुंग कामाची लोभस मुद्रा...

सकाळ वृत्तसेवा

परिस्थितीच अनुकूल नाही असे म्हणून एकाच जागी हतबल होऊन बसलेल्या माणसाला कार्यप्रवण करणारे आत्मवृत्त ‘शाही मुद्रा’ सुरेश शहा यांनी लिहिले आणि का सच्च्या कार्यकर्त्याचे चरित्र उजेडात आले. मूळचे कुर्डुवाडीचे सुरेश शहा जगण्याच्या प्रवाहात अनेक ठिकाणी आपला मुक्काम ठोकून थांबले. कुर्डुवाडी ते प्रिमियर कंपनीतील नोकरी, कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मांडणारी संघटना, त्यातला अनोळखी संघर्ष, गेटवरच्या मीटिंगा, आंदोलने, ‘‘प्रिमियर कामगार'' साप्ताहिकाचे काम नरेंद्र पाटलांच्या धाडसी नेतृत्वाने जोरात सुरूच ठेवले. महात्मा गांधीजींच्या मूलभूत विचारांचा आधार घेऊन कामगारांसाठी कर्तव्य संहिताही मांडली. हक्क नुसतेच नको, कर्तव्याचा विसर म्हणजे बेईमानी हे ठासून मांडले. अशा क्रांतिकारी सत्यदर्शन घडविणाऱ्या माणसाला अनुयायी कोठून मिळणार? शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचाही परिचय, भेटी प्रेरणादायी ठरल्या.

याच्या मुळाशी सुरेशभाईंचा संघर्षशील पिंडच होता. बालपण आर्थिक अभावात गेलेले. भावा-बहिणींची जबाबदारी. शालेय शिक्षणाच्या पुस्तक-वह्यांच्या गरजांसाठी आठवडे बाजार केले. आसपासच्या खेड्यात भ्रमंती. लहान-लहान वस्तू विकून उदरनिर्वाह, शिक्षण करणे हे महाकठीण काम; पण सुरेशभाईंनी त्यावरही मात केली. समाजसेवा करण्याची उर्मी गप्प बसू देत नव्हती. टाळेबंदीमुळे प्रिमियरची नोकरी सुटली. सोलापूरला निंबोळीच्या कारखान्यात काम मिळाले. मंगळवेढ्यासही काही दिवस डाक बंगल्याच्या कामावर देखरेख केली.

ज्या व्यवसायामुळे सुरेश शहांचे नाव सर्वदूर पसरले, तो मुद्रणाचा व्यवसाय कुर्डुवाडीतच त्यांनी सुरू केला. घरच्यांपासून सगळ्यांचा विरोध होता. आपल्या घराण्यात कुणी लोखंडी मशिनरीचा व्यवसाय केलेला नाही. त्या वेळी वरळीचे एस्कॉयर प्रेसचे भागीदार वि. ग. शेंबेकर यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार गिरगावातल्या भटवाडीतील एका प्रेसमध्ये उमेदवारी केली. कंपोज, प्रिंटिंग, बाईंडिंग शिकून घेतले. सुरेश भाईंच्या आयुष्यभराचे उघड गुपित म्हणजे सतत दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्याबद्दल आदर बाळगणे आणि त्याचे विस्मरण आयुष्यात कधीही होऊ न देणे. पुढे मुद्रण परिषदेचे ते अध्यक्ष झाले. मुद्रणाची खूप पारितोषिके मिळविली. ‘मयूर प्रिंटर्स कुर्डुवाडी'' या नावाचा मुद्रण क्षेत्रात एक दबदबा निर्माण केला. एका छोट्या गावात राहून उत्तुंग काम कसे करता येते याचा आदर्श समोर ठेवला. हीच त्यांच्या आत्मवृत्ताची "शाही मुद्रा''ची स्पष्ट मुद्रा आहे.

एखाद्या माणसाचे आयुष्य अनेक कार्यमग्न अध्यायाचे असावे असे म्हणणे कितीही गोंडस असले तरी ते फार क्‍लेषकारक असते. पत्रकारितेच्या क्षेत्रातीलही शिखर त्यांनी गाठले. सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर, शतकभर वृत्तपत्र चालविणारे कै. बाबूराव जक्कल यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आयुष्यभर व्रतस्थपणाने पत्रकारिता केली. ‘सकाळ’ चे बातमीदार म्हणून काम करताना समाजस्वास्थ्य आणि समाजप्रबोधन यासाठी अन्यायावर तुटून पडण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले आणि ते चाळीस वर्षे प्राणपणाने जपलेही. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. शोध पत्रकारिता हा त्यांचा ध्यासच. कुर्डुवाडीच्या रेल्वेच्या अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, नगरपालिकेतील भ्रष्टचार चव्हाट्यावर मांडली. त्यासाठी जीवघेणा संघर्ष केला. हाणामाऱ्या झाल्या. मोर्चे झाले. आंदोलने, कोर्टकचेरी झाली; पण सत्याचाच पाठलाग करणाऱ्या सुरेशभाईंनी ही लढाईसुद्धा जिंकली.

कुर्डुवाडीच्या जनता बॅंकेला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातही अध्यक्ष म्हणून सुरेशभाईंचा मोलाचा वाटा आहे. बॅंकांचा आधार सर्वसामान्यांना वाटला पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील ही बॅंक आज अग्रेसर आहे. अर्थव्यवहार सुरक्षित ठेवणे आजच्या काळात फार कठीण आहे अशा काळातही ही बॅंक सर्व संचालकांच्या ध्येयधोरणाने चांगलीच टिकून आहे. सुरेशभाईंनी महावीर वाचनालय, व्याख्यानमाला, वधू-वर सूचक मेळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, गुणीजनांचा सन्मान अनेक मोठ्या माणसांना बोलावून त्यांची व्याख्याने याचे नेटके आयोजन करून आपली एक सुबक मुद्रा उमटविलेलीच आहे. एकाच आयुष्यात इतक्‍या विविध क्षेत्रांत त्यांना समर्पण वृत्तीने काम करता आले याचे श्रेय त्यांच्या पत्नी प्रतिमा व कुटुंबातील सर्वांना द्यायलाच हवे.

पुस्तकाचं नाव : शाही मुद्रा

लेखक : सुरेश शहा,

प्रकाशक : सुमेरू प्रिंटर्स ॲन्ड पब्लिशर्स

डोबिंवली, मुंबई (०२५१ -२४३५९६८, ९८६७५०८८१४)

पृष्ठं : ३७४ मूल्य : ४०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT