ramesh pokhriyal student should read at least one book one month 
सप्तरंग

विद्यार्थ्यांनो, महिन्याला एकतरी पुस्तक वाचा!

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : ''हुतात्मा भगतसिंग यांना शालेय जीवनापासून वाचनाची प्रचंड आवड होती. त्यातून त्यांच्या जाज्वल्य विचारांना बैठक मिळाली. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्याला एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा'', असा संदेश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री (शिक्षणमंत्री) रमेश पोखरियाल निशंक यांनी दिला. ब्रिटिशांविरोधात सशस्र लढा देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च रोजी फाशी देण्यात आली. या‌ 'शहीद दिना'चे औचित्य साधत त्यांनी हा संदेश दिला आहे. ते म्हणाले, " भगतसिंग‌ यांचे वाचन वैविध्यपूर्ण होते विज्ञान, साहित्य आणि तत्वज्ञान या पुस्तकांचा त्यात समावेश होता. त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीचे वाचन हे कारण असू शकते. ते एक विचारवंत आणि तत्वज्ञ होते. म्हणूनच आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व यातून ओळखावे. दर महिन्याला एक पुस्तक वाचून त्यातून आलेले अनुभव आणि निरीक्षणांविषयी मित्रांबरोबर चर्चा करण्याची सवय लावून घ्यावी.


शिक्षक आणि पालकांनीही तरुणांना वाचनाच्या विविध संधी उपलब्ध दिल्या पाहिजेत. बालपण आणि तरुण वयात केलेले वाचन हे  चिरस्थायी ठसा उमटवत असते. यामुळे समाजात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा मिळते. तसेच वाचन हे विचारसरणीला आकार देते. म्हणून मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविली पाहिजे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. त्यांचा‌ त्याग आणि बलिदान हे तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे पोखरियाल म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भगतसिंग हे त्यांच्या ध्येयविषयी एवढे दृढनिश्चयी होते, की त्यांनी जालियनवाला येथील‌ माती नेहमी जवळ ठेवत. त्यातून त्यांनी उद्दिष्टांपर्यंत पोचण्याची प्रेरणा मिळत असे. मातृभूमी असलेल्या भारताच्या मातीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. म्हणून त्यांनी राजगुरू आणि सुखदेव यांच्या मदतीने त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्र लढा उभारला होता.  ब्रिटिशांपासून मायभूमीला मुक्त करणे हेच त्यांचे उदिष्ट होते, त्यासाठीच ते जगले आणि त्यासाठीच त्यांनी बलिदान दिले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याने दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण; 9 जणांविरोधात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT