saptrang sakal
सप्तरंग

रानभूल ; दक्षिणेतला स्वर्ग मुकांबिका

मनाने निसर्गाच्या जवळ गेल्यावर त्याचे नानाविध रंग, छटा आपल्याला दिसू लागतात.

अनुज खरे

-अनुज खरे

informanuj@gmail.com

दक्षिण भारतातील अनेक जंगलांबद्दल आजपर्यंत आपण माहिती घेतली. ही जंगलं एकमेकांपासून वेगळी असली, त्यांच्यात अनेक गोष्टीत विविधता असली तरीही एक गोष्ट मात्र या सर्व जंगलांना एका समान धाग्याने जोडून ठेवते, ती म्हणजे ‘आनंद’. दक्षिण भारतातील भद्रा, बंदीपूर, मदुमलाई. शरावती, कुद्रेमुख अशा कोणत्याही जंगलात जा. तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं सुख - समाधान मिळतं. जंगलाबद्दल आंतरिक ओढ तयार होते. आणि आपण निसर्गाकडे खेचले जातो.

मनाने निसर्गाच्या जवळ गेल्यावर त्याचे नानाविध रंग, छटा आपल्याला दिसू लागतात. त्याचे सूर समजायला लागतात. त्याच्या तालाशी आपण आपल्या जीवनाचा ताल जुळवून घेऊ शकलो की मग जो परमानंद मिळतो त्याची तुलना आपण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही. निसर्गात फिरताना निसर्ग समजून घेताना त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. ही सर्व जंगलं आपल्याला निसर्गाच्या हमखास जवळ घेऊन जातात. केवळ दक्षिण भारतातीलच नाही तर भारतातल्या कुठल्याही भागातली जंगलं तितकीच सुंदर. पण मला मात्र दक्षिण भारतातली जंगलं विशेष आवडतात.

इथल्या कुठल्याही जंगलात गेलो तरी आपल्याला त्या जंगलात एक प्रकारची गूढता भरून राहिल्याचा भास होतो. मुख्यता सदाहरित किंवा निमसदाहरीत जंगल प्रकारात मोडणारी ही जंगलं. त्यामुळे वर्षभरात केव्हाही जा, यांच्यातलं हिरवंपण तसंच टिकून राहिलेलं तुम्हाला दिसतं.

बऱ्याच जंगलांमध्ये अगदी पुराणकाळापासून असणारं एखादं मंदिर तुम्हाला आढळून येईलच. या मंदिराला एखादी तितकीच जुनी अशी एखादी कथा असते. आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला वाढलेलं ते जंगल तुम्हाला अध्यात्म आणि निसर्ग यांच्या सुंदर मिलाफाचं सुरेख दर्शन घडवतं. दक्षिण भारतातल्या अशाच एका जंगलाची आपण आज माहिती घेणार आहोत. हे जंगल म्हणजे मुकांबिका वन्यजीव अभयारण्य. हे जंगल खरं तर खूपच सुंदर. पण येथे पर्यटकांचा ओढा तसा कमीच आहे. किंबहुना हे जंगल फारसं प्रकाशात आलेलं नाही. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे जंगल जैवविविधतेचा खजिनाच आहेत.

मुकांबिका वन्यजीव अभयारण्य हे कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील कोल्लूरमध्ये आहे. १९७८ मध्ये २२ मे रोजी या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सुमारे ३७०.३७ चौरस किलोमीटर एवढ्या प्रदेशात पसरलेल्या या जंगलात सदाहरित, निमसदाहरित आणि शुष्क पानझडी हे तिन्ही जंगलप्रकार आढळून येतात. बहुतांशी जंगल हे वर्षभर हिरवेगार असते. मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस आणि त्यावर अवलंबून असलेली जैवविविधता हे जंगलाचे वैशिष्ट्य. जंगलाला हे नाव इथं असलेल्या मुकांबिका मंदिरावरून पडले आहे.

कर्नाटकात कोलन नावाच्या ऋषींचे वास्तव्य होते. तेथे राहून तपश्चर्या करताना कामासूर नावाचा राक्षस त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणत असे. तेव्हा या ऋषींनी देवीची प्रार्थना केली. देवीने कामासुराची वाचा बंद केली. त्यामुळे तो मुकासुर झाला. मग या मुक्या कामासुराचा देवीने वध केला. तेव्हापासून देवीला मुकांबिका म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या पूर्व दरवाज्याजवळून अग्नितीर्थ नदी वाहते. ही नदी सौपर्णिका नदीची शाखा आहे. हे मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. मंदिराचा कळस गोपुरासारखा द्राविड शैलीतला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उंच दीपस्तंभ आणि ध्वजस्तंभ आहेत. आत असलेल्या लक्ष्मीमंडपात खांबांवर अनेक देवदेवतांच्या सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. देवीची मूर्ती असणाऱ्या गाभाऱ्याचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मंदिर हे मुख्य आकर्षण आहे. मंदिराच्या आसपासच्या जंगलाला मुकांबिका अभयारण्य असे नाव पडले. जंगलात कुडजाद्री पर्वताच्या टेकड्यांचा मोठा प्रदेश येतो. याच टेकड्यांमध्ये सौपर्णिका आणि इतर काही नद्यांचा उगम आहे. चक्रा ही या जंगलातून वाहणारी आणखी एक मुख्य नदी. या नद्या जंगलाला आवश्यक असलेली पाण्याची मुख्य गरज भागवतात. टेकड्यांचा उताराचा भाग हा सदाहरित आणि निमसदाहरित प्रकारात मोडणाऱ्या झाडांनी व्यापलेला आहे. अभयारण्याची विभागणी कोअर झोन आणि बफर झोन यात करण्यात आली आहे.

दक्षिणेकडील सोमेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि उत्तरेकडील शरावती वन्यजीव अभयारण्य या जंगलांना जोडण्यात मुकांबिका अभयारण्य अत्यंत मोलाची भूमिका बजावतं. जंगलात सिंहपुच्छ माकड, लाजवंती अर्थात स्लेंडर लोरीस अशा अनेक दुर्मीळ प्राणी पक्ष्यांचा आढळ आहे. अप्रतिम निसर्ग विविधतेने नटलेलं हे जंगल आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतं. जंगलात एक ट्रेक आहे जो आपल्याला अर्सिनागुडी धबधब्याशी घेऊन जातो. याशिवाय जंगलात सनसेट पॉइंट, कूसाली धबधबा, बेल्कल तीर्थ धबधबा ही ठिकाणंही पाहण्यासारखी आहेत.

येथे असलेले वनरक्षक आनंद हुडार यांनी येथे असलेल्या एका दुर्मीळ वेलीचा आढळ शोधून काढला. स्थानिक भाषेत या वेलीला अर्सिना बल्ली असे म्हणतात. ही वेल दुर्मीळ तर आहेच पण याचबरोबर या वेलीचा औषधी उपयोगही मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी आयुर्वेदातही या वेलीचा उल्लेख आढळतो. या अतिशय दुर्मीळ वेलीचे संवर्धन करण्यासाठी कर्नाटक वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. निशाचर म्हणून ओळखला जाणारा लाजवंती अर्थात स्लेंडर लोरीस हा दुर्मीळ सस्तन प्राणी येथे चांगल्या संख्येने आढळून येतो. रात्रीच्या वेळी सक्रिय असणाऱ्या या प्राण्याची हालचाल अतिशय मंद असते. साधारणतः एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर जाणारा हा प्राणी जमिनीवर उतरल्याची नोंद तशी दुर्मीळच आहे.

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या मुकांबिका जंगलाला भेट दिल्यावर आपण या जंगलाच्या प्रेमातच पडतो. कमी पर्यटक येत असल्यामुळे एक प्रकारची शांतता आपल्याला या जंगलात आल्यावर लाभते. आपलं निसर्गाशी नातं जुळतं. त्याने आपल्या पोतडीतून उघडलेल्या प्राणी, पक्षी, वनस्पती अशा असंख्य सुंदर गोष्टींचं निरीक्षण करण्यात आपण अगदी रममाण होतो. मुकांबिका जंगलात असणारा निसर्ग आणि त्याच्या जुन्या जाणतेपणाची साक्ष देणारं मुकांबिका देवीचं मंदिर यांच्या सानिध्यात आल्यावर अध्यात्म आणि निसर्ग यांच्या विलक्षण मिलाफातून आपल्याला स्वर्गीय आनंदच मिळतो. दक्षिणेकडच्या या स्वर्गाचं सुख घेताना आपण निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जातो. आणि परिपूर्णतेचं अनोखं समाधान आपल्याला लाभतं.

कसे जाल?

पुणे/मुंबई-बंगळुरू-शिमोगा-सागर-नागोडी घाट-मुकांबिका

भेट देण्यास उत्तम हंगाम

नोव्हेंबर ते मार्च

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी

गवा, सिंहापुच्छ माकड, वाघ, बिबट्या, रानकुत्रे, कोल्हा, माकड, वानर, लाजवंती, अस्वल, चितळ, सांबर, भेकर, शेकरू, इ.

पक्षी

पर्वत कस्तुर, मलबारी राखी धनेश, मलबारी कवड्या धनेश, महाधनेश, पिवळ्या भुवईचा बुलबुल, छोटा निखार, नारंगी गोमेट , भृंगराज, मलबार शीळ कस्तूर , राखी रानकोंबडा, मासेमार घुबड , तपकिरी वन घुबड , बेडूकतोंडया, सुर्यपक्षी, चष्मेवाला, हळद्या, इ.

सरपटणारे प्राणी

नागराज, नाग, फुरसे, मण्यार, घोणस, धामण, नानेटी, चापडा, घोरपड, मगर, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. )

(शब्दांकन : ओंकार बापट )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

आनंदाची बातमी! 'गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार': मंत्री प्रताप सरनाईक; वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार

Latest Marathi News Live Updates : भोयर बायपासवर रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

SCROLL FOR NEXT