
Shivsena Kolhapur : कोल्हापूर ‘जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी मिळवून देण्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा आहे. याउलट माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची कारकीर्द कर्तव्यशून्य राहिली आहे. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांना जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे या दोघांकडून वैफल्यातून क्षीरसागर यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप सुरू आहेत’, असे प्रत्युत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.