WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

Australia defeat West Indies by 176 runs in Jamaica Test: वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत अवघ्या २७ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम झाला आहे.
West Indies vs Australia 3rd Test
West Indies vs Australia 3rd TestSakal
Updated on

थोडक्यात :

  • ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका ३-० अशी जिंकत वर्चस्व सिद्ध केलं.

  • दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला केवळ २७ धावांवर गुंडाळलं.

  • बोलंडने हॅटट्रिक घेतली.

ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. इतकेच नाही, तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना दणक्यात जिंकला. ऑस्ट्रेलियाने जमैकाला झालेला तिसरा कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी (सोमवार, १४ जुलै) १७६ धावांनी जिंकला. याबरोबरच कसोटी मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

१०० वा कसोटी सामना खेळणारा मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दरम्यान, हा सामना वेस्ट इंडिजसाठी विस्मरणात जावा असाच राहिला. त्यांनी या सामन्यात निचांकी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम केला.

West Indies vs Australia 3rd Test
WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com