गुणऱ्हासाची चिंता  Sakal
सप्तरंग

क्षितिजे अपार : गुणऱ्हासाची चिंता

हळूहळू कोविडची भीती समाजातून कमी झालेली दिसते.

डॉ. समीर दलवाई

हळूहळू कोविडची भीती समाजातून कमी झालेली दिसते. शाळा सुरू झाल्यानंतर मुले पुन्हा दप्तर, गणवेश घालून शाळेत जाताना दिसताहेत. हे जरी दिलासादायक असले, तरी त्याची दुसरी एक बाजू आता समोर येत आहे. खरे तर अभ्यासक्रम सुरळीत होण्याचा विचार आधीच करायला हवा होता; पण यंत्रणेचेच होमवर्क कमी पडल्याचे दिसते. त्यातच आता मुलांना गुणऱ्हासाचीही चिंता अस्वस्थ करणारी आहे.

झ्याकडे नियमित येणारे एक दाम्पत्य आहे. त्यांचा मुलगा दहावी आयसीएससी बोर्डात आहे. दहावीची परीक्षा प्रत्येक बोर्डानुसार होत असते. जेव्हा आयबी, आयसीएससी, आयजीएससी किंवा सीबीएससीच्या मुलांना अकरावी, बारावीसाठी सामान्य राज्य बोर्डाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, तेव्हा अडचण येते.

गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतला, तर मार्च २०२० मध्ये अचानक शाळा बंद पडल्या. लॉकडाऊननंतर परीक्षाही सर्व रद्द केल्या गेल्या. नववीच्या मुलांचीही परीक्षा रद्द केली गेली; पण ही सूचना येईपर्यंत बराच उशीर झाला होता. जून २०२१ पासून सीबीएससीने घोषणा केली, त्यांची सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ अशा दोन परीक्षा होणार. सेमिस्टर १ मध्ये फक्त पर्याय निवडा, अशा पद्धतीची परीक्षा पद्धत राबवली आणि सेमिस्टर २ मार्च २०२२ मध्येही विषयाला अनुसरून होईल, असे सांगितले. काही महिन्यांनंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आयसीएससीनेही सारखीच घोषणा केली, त्यांचीही सेमिस्टर पद्धत आहे, आणि पर्याय निवडणे अशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. गुणांचे प्रकार कसे असतील, अभ्यासक्रम कसा असेल, काय प्रकारचे प्रश्न असतील, या सर्वच गोष्टी नवीन असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल सविस्तर माहिती न देता अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

आज मुलं दहावीची परीक्षा द्यायला तयार झाली आहेत. सेमिस्टर १ डिसेंबरपर्यंत संपली, जी पर्यायांची परीक्षा होती. मुलांना त्याची सवय कदाचित नव्हती. त्यातही काही इतर परीक्षा नाहीत, प्रकल्पाचे गुण नाहीत. त्यामुळे त्यांचा आणखी गोंधळ उडणार आहे. आता जेव्हा मुलं नव्याने परीक्षा देतील तेव्हा त्यांचे गुण इतर परीक्षांच्या तुलनेत खूप कमी असतील. म्हणजे ९८ टक्के किंवा ९७ टक्के ज्या मुलांना अपेक्षित गुण होते, तिथे त्यांना जवळपास ८० ते ८५ टक्के गुण मिळतील. त्यामुळे त्यांचा हिरमोड होऊ शकेल. काही लोक म्हणतील कोविड वर्ष, यात आपण जगलो हेच महत्त्वाचे आहे. पण जी मुले पहिली ते पाचवीपर्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन चांगल्या स्पर्धेसाठी तयार होती, त्यांचा विश्वास मोडलेला आहे. आता ते अचानक ८० ते ८५ टक्क्यांवर आले आहेत. समाज त्यांना एवढे कमी गुण कसे मिळाले, व्यवस्थित अभ्यास केला नाही, आई-वडिलांनी शिकवले नाही का, अशा अनेक प्रश्नांनी मुलांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला आहे.

चांगले करिअर असलेली मुलं आज नैराश्यात आणि अपयशाच्या विळख्यात सापडली आहेत. अशा मुलांची संख्या खूप कमी आहे. जी मुले दुसरी ते चौथीत आहेत, राज्याच्या बोर्डात आहेत, गावोगावी आहेत, ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, कदाचित शहरातही असतील त्यांचे आकलन काय झाले आहे, हे आपल्याला माहितीही पडणार नाही. त्यांचे प्रशिक्षण नेमके काय होते, अभ्यासक्रम काय होता, यावर गेली दोन वर्षे कोणी विचार केला आहे? अजूनही त्यावर ज्या प्रकारची चर्चा व्हायला हवी ती तशी सुरू नाही. याकडे तातडीने सरकारने, शिक्षणतज्ज्ञांनी लक्ष दिले पाहिजे आणि पालकांसोबत बसून आपण यावर चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT