‘डार्क’ या वेब सिरीजचा तिसरा सीझन रसिकांसमोर आला आहे. वरवर पाहता या सिरीजमधलं कथानक खूप छोटं आहे. मात्र, जसजसं तुम्ही या कथानकात शिरत जाता, तेव्हा मात्र त्या करमणुकीच्या अथांग समुद्रात हरवून बसता, आणि त्यातून बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं. विंडन शहरातून, त्या गुहेतून, त्या पात्रांमधून आपण बाहेरच पडू शकत नाही, अशी मोहिनी घालणाऱ्या या वेब सिरीजविषयी...
तुमच्या मनावर कित्येक वर्षं एक गोष्ट कायम बिंबवली जाते आणि एक दिवस अचानक तुम्हाला जे सांगितलं, ते सगळं अस्तित्वातच नव्हतं असं कुणी केलं तर काय अवस्था होईल? तशीच अवस्था माझी आहे! लॉकडाऊनमधला जून महिना खूप सॉलिड होता माझ्यासाठी, कारण डार्क या वेब सिरीजमुळे. मध्ये कुठंतरी वाचलेलं, की एका भारतीय सिनेमा का वेब सिरीजच्या आक्षेपार्ह टायटलमुळे सध्या एक ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याची चर्चासुद्धा लोकांमध्ये व्हायला लागली आहे. अशा लोकांना माझी नम्र विनंती आहे, की प्रेक्षक म्हणून तुम्ही प्रगल्भ व्हायची गरज आहे, वेब सिरीजसारखी सुवर्णसंधी आपल्यासमोर उभी आहे. त्याला बंद वगैरे करू नका, आणि जर तसं झालं तर त्यात कलाकारांचं फारसं नाही; पण प्रेक्षक म्हणून आपलं प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे जो कंटेंट आवडणार नाही, त्यावर उघडपणे भाष्य करा, त्याचा विरोध करा, आपोआप तिथंही बदल घडतील; पण बॉयकॉट किंवा बॅन हा ऑप्शन नाही...!
असो- तर डार्कबद्दल बोलतो. आजवर वेब सिरीजच्या दुनियेतला सर्वांत बेस्ट सीझन फिनाले कुठला असेल, तर तो डार्कचा सीझन ३. या सिरीजबद्दल बोलताना त्यातलाच एक डायलॉग मला आठवतो. तो असा, की ‘What we know is a drop, what we dont know is a ocean!’ डार्कच्या बाबतीतसुद्धा अगदी तसंच लागू होतं. म्हणजे यातून तुम्हाला जे दिसतं, ते कथानक खूप छोटं आहे आणि जसजसं तुम्ही या कथानकात शिरत जाता, तेव्हा मात्र त्या करमणुकीच्या अथांग समुद्रात हरवून बसता, आणि त्यातून बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं. मला नाही वाटत, मी पुढचे आणखी काही दिवस त्या विंडन शहरातून, त्या गुहेतून, त्या पात्रांमधून बाहेर पडू शकेन...कारण गेला महिनाभर जणू मी त्या विंडन शहराचा एक भाग झालो होतो. ती पात्रं माझी जीवलग झाली होती. मला आठवतंय, असं मला गेम ऑफ थ्रोन्स पाहिलं तेव्हा झालेलं. मात्र, आज डार्कने पुन्हा तो अनुभव दिला. बास आणखीन काय हवं आयुष्यात!
आज मी या सिरीजच्या मेकर्सबद्दल, त्या कथेबद्दल, त्यातल्या प्रत्येक कलाकारांबद्दल काहीच बोलणार नाहीये, कारण माझी तेवढी कुवत नाही. या सिरीजचे मेकर्स तेव्हाच अजरामर झाले- जेव्हा त्यांनी सन २०१७ मध्ये या शोचा पहिला सीझन काढला. तेव्हा सन २०२० आणि अगदी २०५४ पर्यंतचं भाकित करणं- भले ते काल्पनिक कथेच्या माध्यमातून का असेना, हेच एक मोठं धाडस होतं. सीझन १ पासून हे कथानक त्याचं नाव सार्थकी लावतं. ती कथा, त्यातलं नाट्य, त्यातली पात्रं, त्यांचे नातेसंबंध, या सगळ्यात त्या शहराचा सांस्कृतिक, भौगोलिक इतिहास, तिथल्या लोकांच्या नात्यातली गुंतागुंत, त्या लोकांचा स्वभाव, त्यांची सिक्रेटस, हे सगळंच इतकं गडद आहे, की सीझन ३पर्यंत येता येता आपण त्यात इतके इन्व्हॉल्व्ह होतो, की ते कधीच संपू नये असं वाटतं...पण हीच तर खरी मजा आहे. या कथेतला आणखीन एक डायलॉग आहे- त्यातूनही आपण बरंच काही शिकू शकतो. तो म्हणजे ‘the beginning is the end, and end is the begginig!’ सुरुवात ते शेवट ही सिरीज या वाक्याला आणि अशा कित्येक वाक्यांना न्याय देते ते पाहून खरंच सुन्न व्हायला होतं..!
ही सिरीज टाईम ट्रॅव्हल, साय फाय फिक्शन या सगळ्यांच्या पलीकडची आहे. म्हणजे या तोडीस तोड कथा साकारणारा माझ्या नजरेत तरी एकमेव माणूसच आहे तो म्हणजे ख्रिस्तोफर नोलन! पण डार्क नोलनच्या इनसेप्शनपेक्षासुद्धा काही लेव्हल वरची आहे. याचं कार म्हणजे टाईम ट्रॅव्हल आणि सायन्स फिक्शन हा पार्ट यामध्ये असूनसुद्धा यातल्या ह्युमन कॅरॅक्टरमध्ये डेव्हलप केलेलं रिलेशन. डार्कमध्ये फक्त नात्यांची गुंतागुंत नाही, तर त्याला दिलेलं एक प्रॉपर जस्टीफिकेशन आणि त्यातून घडणारं नाट्य आणि टाईम ट्रॅव्हल, सायन्स फिक्शनचा अद्भुत थरार हा जो काही समन्वय साधला आहे, तो कदाचित नोलनलासुद्धा साधणं कदाचित कठीण जाईल. तसं बघायला गेलं, तर डार्क ही अगदी सोप्पी सिरीज आहे; पण भाईजान फॅन्स किंवा हाऊसफुल कॅटेगरीवाल्यांनी चुकूनसुद्धा इथं फिरकू नये, आणि जरी फिरकलात तरी बाजूला काढलेलं डोकं जागेवर लावलं, तरच यातलं सगळं कथानक नीट समजेल! यातली कंटिन्युटी, नेपथ्य, कलादिग्दर्शन, संकलन, पटकथा, पार्श्वसंगीत अशा काही विशेष कॅटेगरीसाठी या सिरीजला जितके पुरस्कार द्याल तितके कमी आहेत. खासकरुन या तिसऱ्या म्हणजे फायनल सीझनचं एडिटिंग आणि म्युझिक इतकं अंगावर येणारं आहे, की त्याचं शब्दांत वर्णन करणं अवघड आहे!
काय बोलू आणि किती बोलू असं झालंय, इतका परफेक्ट शेवट पचवायची सवय नाहीये त्यामुळेच कदाचित भावुक झालो असेन; पण हा असा शेवट पुन्हा होणे नाही, अशी सिरीज पुन्हा होणे नाही...ते विंडन शहर, त्यातली ती सगळी पात्रं सगळंच खूप मिस करणार आहे...आणि खासकरून या सिरीजचं गुडबाय हे टायटल ट्रॅक आणि त्या ऍनिमेशन मधूनसुद्धा बरंच काही सांगणाऱ्या इमेजेस...यार, खरंच इतकं लवकर नको संपायला हवी होती ही सिरीज; पण ठीक आहे थोडक्यात आनंद मानायचा. उगाच लांबड लावून कथेचा फाफटपसारा मांडण्यापेक्षा थोडक्यात उरकलं आणि लोकांच्या मानवर कायमची छाप सोडली या सिरीजने हेही नसे थोडके. वर्ल्ड क्लास कंटेंट काय असतो याचा अनुभव घेण्यासाठी ही सिरीज अवश्य बघाच..Its not everyone's cup of tea but still i suggest just give it a try and taste the tea atleast. अशा कलाकृती क्वचितच पाहायला मिळतात...शक्य होईल तशी बघा; पण बघा. ते ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर लस्ट स्टोरीजसारख्या सिरीज बघणाऱ्या लोकांनी अशा प्रकारच्या इंटरनॅशनल सिरीज बघायला सुरुवात करा आणि मग सांगा ओटीटी प्लॅटफॉर्म्सबाबत तुमचं आधीचं मत कायम आहे का नाही ते??? धन्यवाद!
(स्पॉयलर्स येऊ नयेत म्हणून बऱ्याच गोष्टी लिहिल्या नाहीयेत, नाहीतर या सिरीजवर, त्यातल्या आयडियोलॉजीवर, कन्सेप्ट वर, Law of 33 years वर थिसिस लिहिले जातील. एकदा तरी अवश्य बघाच!)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.