लेखक : के. सी. पांडे
हजारो वर्षांपासून भूगर्भात दडलेले मिनरल्स म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा एक जिवंत झराच म्हणायला हवा. या मिनरल्सच्या संपर्कातून आपल्याला मानसिक, शारीरिक, सकारात्मक दृष्टिकोन व ऊर्जा निर्माण होईल, याबद्दल तिळमात्र शंका नाही.
प्रत्येकाने हा अनुभव एकदा घेऊन पाहण्यासारखा आहे. सिन्नरस्थित संग्रहालयात हे सर्व उपलब्ध आहेत. (saptarang marathi article by k c pande on Minerals living source of positive energy nashik Latest Marathi article)
निसर्गाची देणगी असलेले ग्रह, तारे, जमीन, भूगर्भ, सूर्य, चंद्र यांचा निरनिराळ्या प्रकारे आपल्या जीवनावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव असतो. यापासून आपण वेगळे नाही. ते आहेत म्हणून तर आपण आहोत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या ऊर्जेतून आपले जीवन सुरळीतपणे चालू आहे.
भूगर्भात असणाऱ्या लाखो वर्षांपूर्वीच्या गारगोटी दगडामध्येही प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. ही आपल्यावर शारीरिक व मानसिक प्रभाव टाकू शकते. निरनिराळ्या प्रकारचे गारगोटी दगड आपण हातात जरी घेतले तरी त्यातील ऊर्जा, त्यातील संवेदना आपणास लक्षात येईल.
याचीच प्रचीती म्हणून अलीकडे याच दगडांवर प्रक्रिया केलेले अनेक खडे रत्न आपण वापरतो. त्यांच्यापासूनच जर आपणास एवढी ऊर्जा मिळत असेल तर या गारगोटी दगडांची नैसर्गिक स्वरूपात कितीतरी पटीने अधिक ऊर्जा आपणामध्ये निर्माण होईल, म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आपण सल्ला घेऊन विशिष्ट प्रकारचे गारगोटी मिनरल संग्रही ठेवून त्याचा अनुभव घ्यावा. निश्चितच आपल्या जीवनात मानसिक, शारीरिक, सकारात्मक दृष्टिकोन व ऊर्जा निर्माण होईल, याबद्दल तिळमात्र शंका नाही.
मिनरल दगडामार्फत होणारे उपचार याला अनेक वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. आजही व पूर्वीही औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जात असे. मानवी शरीरात तयार केलेल्या कंप क्रिस्टल ऊर्जा उत्सर्जित करतात. दगडांची ऊर्जा आपल्या अवयव, उती आणि पेशींवर परिणाम करते व त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो.
अनेक स्फटिक मिनरलचा मज्जासंस्था, हृदय रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर सुरळीतपणे व शांतपणे सुरू राहण्याचा प्रभाव त्यावर पडतो. एखादे स्फटिक क्रिस्टल ज्या प्रकारे परिधान करतो, आपण त्याचा उच्च रक्तदाब, हायपर टेंशन नष्ट करणे हे काम करते. काही गारगोटी दगड रक्तदाब सामान्य करतात. यामुळे ऑक्सिजनपुरवठा सुरळीत होतो. काही मिनरल तर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा प्रोत्साहित करतात. हृदयाचे कार्य स्थिर होते व डोकेदुखीच्या समस्येतून मुक्तता मिळते.
ॲक्वामरिनसारखे मिनरल शरीरामध्ये एक प्रकारे संरक्षण करण्याचे काम करतात. त्वचा, फुफ्फुस, दातदुखी, वेटलॉस, पोट, यकृत यावर त्यांचा प्रभाव पडतो. मनातील ताणतणावापासून मुक्तीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी या मिनरल गारगोटींच्या सहवासात आजपर्यंत आहे. माझ्यामध्ये निर्माण झालेली ऊर्जा त्यातून मिळाली, म्हणजे मला जगभर यश मिळण्याचे मुख्य कारण भक्ती, सेवाभाव, प्रामाणिकपणा आहे.
पण याचबरोबर आयुष्यभर मला या मिनरल दगडांचा सहवास लाभला व यामधून माझ्यामध्ये मानसिक व शारीरिक सकारात्मक बदल होऊन एक शक्ती निर्माण झाली, की त्यामुळे मी सर्व संघर्षावर मात करून गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभा करू शकलो. हे संग्रहालय जगभर प्रसिद्ध आहे. याचे मूळ कारण गारगोटी मिनरलचा सहवास होय.
ॲक्वामरिन रेड फ्लोराइड, स्कुली लाइट कॅलसाइट, ग्रीन व व्हाइट ॲपोपलाइट यांसह अनेक गारगोटी मिनरल दगड सिन्नर येथील संग्रहालयात आहेत. मी आपणास आव्हान करतो, की तेथे भेट देऊन निसर्गाचा अनमोल ठेवा बघावा. हे बघितल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनात एक प्रकारे परिवर्तन होईल. अशा प्रकारे सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल टाकता येईल.
(लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.