Book
Book Sakal
सप्तरंग

उद्योजकतेसह समाजभानाची ‘आनंद’प्रेरणा

शीतल पवार shital.pawar@esakal.com

पुस्तकातील विषयांची व्याप्ती त्यांनी प्रस्तावनेत सविस्तर मांडली आहे. त्यात ते म्हणतात त्याप्रमाणे हे त्यांचं ‘कार्यचरित्र’ आहे.

कोणत्याही प्रकारचा थरार नसला तरी बघणाऱ्याला प्रत्येक प्रसंगावर खिळवून ठेवणाऱ्या एखाद्या चित्रपटासारखं आयुष्य जगणं आणि ते तितकंच प्रांजळपणाने पारदर्शकरीत्या पुस्तकातून मांडणं किती अवघड; पण कौशल्यपूर्ण असं एकाचवेळी ठरू शकतं, याचा अनुभव देणारं आत्मकथन म्हणजे आनंद करंदीकर यांचं ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’.

पुस्तकातील विषयांची व्याप्ती त्यांनी प्रस्तावनेत सविस्तर मांडली आहे. त्यात ते म्हणतात त्याप्रमाणे हे त्यांचं ‘कार्यचरित्र’ आहे. त्यामुळे पुस्तकात त्यांनी केलेलं काम, त्यांचा सामाजिक चळवळीतला मोठा सहभाग यावर सविस्तर मांडणी आहे. त्याचबरोबर हे आत्मकथन असल्यामुळे बालपण, कुटुंब, शिक्षण, ‘मला घडविणाऱ्या स्त्रिया’ आणि ‘माझ्या जगण्याची पंचसूत्री’ अशी वैयक्तिक मांडणीही करंदीकर पुस्तकातून करतात.

स्त्री-पुरुष संबंधांबद्दल कुमारवयातील जडणघडण, लिंगभेद टाळणं आणि समतेची शिकवण हे सर्व बालपणापासूनच घरातूनच कसं शिकलो याबद्दल करंदीकर यांनी सविस्तर मांडणी केली आहे. या लेखनाची जमेची बाजू म्हणजे नेमकेपणाने दिलेली उदाहरणं आणि वर्णन केलेले प्रसंग.

करंदीकर यांचं शिक्षण आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, कोलकाता या संस्थांमधून झालं. आपल्या शिक्षणाचा आपल्याला किती आणि कसा उपयोग झाला याची चिकित्सा त्यांनी पुस्तकात केली आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांना या संस्थांचा फायदा झाल्याचं ते लिहितात. शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा अशी त्यांची धारणा राहिली आहे, असं ते स्पष्ट करतात. मात्र, आलेले अनुभव तशी वास्तवता दाखवत नाहीत याची खंतही करंदीकर व्यक्त करतात.

पुस्तकातील पहिल्या दोन प्रकरणांत बालपण आणि शिक्षण याबद्दल मांडणी केल्यानंतर तिसऱ्या प्रकरणापासून ते पंधराव्या प्रकरणापर्यंत लेखक अर्थार्जनासाठीचे आणि इतर सामाजिक प्रयोग यांची सविस्तर मांडणी करतात. त्यामध्ये त्यांनी सुरू केलेले प्रकल्प, संस्था आणि विविध प्रयोग यांची सविस्तर माहिती आहे. यादरम्यान त्यांना भेटलेली माणसं, शिकवून जाणारे प्रसंग आणि त्यातून त्यांनी घेतलेला ‘धडा’ याबद्दलही लेखक मोकळेपणाने लिहितात. जिथं स्वतःचं चुकलंय तिथं प्रांजळ कबुलीही ते देतात, हे विशेष.

पुस्तकात त्यांनी ‘युक्रांद’सोबत केलेलं काम, त्यांचे विविध संशोधन प्रकल्प, जनवादी महिला संघटन, मेट्रिक संस्था आणि त्यासोबतचे अनेकविध सल्ला आणि मनुष्यबळ विकास प्रकल्प, त्यांनी आणि मेट्रिक संस्थेने तयार केलेलं मूल्यमापन-व्यवसायवृद्धीचं मोड्यूल याबद्दल सविस्तर वाचायला मिळेल.

मार्क्सवाद, समाजवाद, सीपीएम, सामाजिक चळवळी आणि त्याचवेळी मॅनेजमेंट आणि संशोधनगुरू अशी बहुआयामी जबाबदारी पार पाडणारे डॉ. आनंद करंदीकर म्हणतात, ‘‘आजच्या तरुणांनी त्यांच्या आवडीनुसार उद्योग किंवा व्यवस्थापन किंवा समाजकार्य अशा कोणत्याही क्षेत्रात काम करावं. मात्र, त्यांनी समाजवादी, भांडवलशाही अशा जुन्या चौकटीत अडकून न राहता, या चौकटी तोडून सृजनशील काम करावं असं मला आवर्जून वाटतं आणि तसं करताना माझे अनुभव उपयोगी ठरावेत म्हणून मी हे माझं ‘कार्यचरित्र’ लिहिलं आहे.’’ करंदीकर यांचा हा कार्यनामा त्यामुळेच सृजनशील, काही करू इच्छिणाऱ्या व समाजभान असणाऱ्या तरुणवर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

पुस्तकाचं नाव : माझ्या धडपडीचा कार्यनामा

लेखक : आनंद करंदीकर

प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे

(०२० - २४४८०६८६, ९६१९४५४२०१)

पृष्ठं : ३२४

मूल्य : ३९५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT