Story of Dr. Deepak Hegde and Dr. Darshana Hegde
Story of Dr. Deepak Hegde and Dr. Darshana Hegde 
सप्तरंग

अनोळखी देशातही यशवंत...

प्राची कुलकर्णी-गरुड prachihere@gmail.com

तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अगदी स्थिर झाला आहात. ठरल्याप्रमाणे तुम्ही ठरवलेल्या मार्गावर जात आहात. व्यवस्थित प्रगती सुरू आहे. आणि अशात कोणी सांगितलं की सगळं सोडून दुसऱ्या, पूर्ण अनोळखी असणाऱ्या देशात जायचं आहे तर? डॉ. दर्शना हेगडे यांना हा निर्णय घ्यावा लागला.

डॉ. दीपक हेगडे आणि दर्शना यांची ओळख महाविद्यालयातली. मुंबईचे रहिवासी असणाऱ्या दोघांनीही फार्मसीसाठी प्रवेश घेतला. याच काळात एका मार्गावरच्या लोकल प्रवासी विद्यार्थ्यांचा ग्रुप जमला. प्रवासात मैत्री वाढली. फार्मसीचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग दोघांनीही पुढंच शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला.

खरंतर फार्मसीची निवड जाणीवपूर्वक झाली नव्हती. डॉ. दीपक सांगतात ‘‘मी बारावी झाल्यानंतर मेडिकलसाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळं फार्मसीकडं वळलो. पण एकदा प्रवेश घेतल्यावर मग ठरवलं की यातच उच्चशिक्षण घ्यायचंच. फार्मसीमध्ये पदवी घेतली आणि मग उच्चशिक्षण घ्यायचं निश्‍चित केलंच "

अर्थात एकत्र शिक्षण झालं, एकच क्षेत्र असलं तरी दोघांनी मार्ग मात्र वेगळे निवडले. दोघांनीही पीएच.डी पूर्ण केलं. पण त्यानंतर डॉक्टर दीपक यांनी उद्योगात म्हणजे उत्पादनक्षेत्रात जायचं ठरवलं तर डॉक्टर दर्शना मात्र शैक्षणिक क्षेत्रात रमल्या. डॉक्टर दर्शना सांगतात, ‘‘ मला लहानपणापासून शिकवण्यात रस होता आणि आम्ही दोघांनीही उद्योगात जाऊन चालणार नाही असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे मी शिक्षणक्षेत्रातच जाण्याचा निर्णय घेतला."

अर्थात दोघांचीही क्षेत्र वेगवेगळी होती तरी शिक्षण आणि संशोधनाचा धागा समान होता. डॉक्टर दीपक यांच्या शब्दात" मी इंडस्ट्रियल सायंटिस्ट आहे. म्हणजे मी जे संशोधन केलं आहे ते माणसांपर्यंत कसे पोचवायचे यावर माझा सगळा भर असतो. बेसिक रिसर्चच्या आधारावर ॲपलाईड रिसर्च होतो". पीएच.डी झाल्यावर एका फ्रेंच कंपनी मध्ये डॉक्टर दीपक यांनी पहिली नोकरी स्वीकारली. फ्रान्स मधून येणारे डॉसियर वाचून त्याची इथं अंमलबजावणी करणं हे त्यांच्याकडचं काम होतं "

दर्शना यांना मास्टर्स करत असतानाच मायक्रोबायोलॉजी शिकवायची संधी मिळाली आणि तिथून शिक्षणाची गोडी लागली. पुढे त्याच महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळाली. पुढं तिथंच दहा वर्ष त्या शिकवत राहिल्या.

दोघांचंही काम नीट सुरू होतं. रूढ अर्थानं करिअर सुरू होतं. पण अशात डॉक्टर दीपक यांना चीनमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. २००७ मध्ये नोकरीसाठी विचारणा झाली. चीनमध्ये जायला फारसं कोणी इच्छुक नव्हतं. त्याबद्दल सांगताना ते म्हणतात ‘‘ २००७ मध्ये मी शांघायला आलो. इथं येताना मला चीनविषयी काहीच माहीत नव्हतं कारण आपल्याकडं याविषयी फारसं काही सांगितलं जात नाही. ही कंपनी जगातल्या उच्चपातळीवरच्या वीस कंपन्यांबरोबर काम करायची.’’

डॉ. दीपक चीनला गेले तरी दर्शना यांनी आपली नोकरी सुरूच ठेवली होती. पण एका टप्प्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलीला वडिलांशिवाय राहायचा त्रास होतोय. ‘‘चीनला जास्त लोक जात नव्हते. तेव्हा मी असा विचार केला होता की दीपक जातील आणि दोन वर्ष काम करून परत येतील. तेव्हा आमची मुलगी तिसरीत होती. तिला वडिलांची खूप आठवण यायची. गृहपाठाच्या वहीत ती लिहायची, ‘डॅडी आय मिस यू.’ मग आम्ही सुट्टीत तिकडे गेलो. तेव्हा तन्वी वडिलांकडं ज्या पद्धतीनं धावत गेली तेव्हा मला जाणवलं की आपण इथं येण्याचा विचार करायलाच हवा."

त्या सांगतात, ‘चीनमध्ये गेल्यावर फार्मसी स्कूलमध्ये शिकवणं किंवा उद्योगात जाणं असे पर्याय असतील असे पर्याय होता.’ दर्शना यांचा उद्योगात जाण्याचा विचार त्यांचा नव्हताच. पण नंतर त्यांना कळलं की त्यासाठी चायनीज भाषा येणं गरजेचं आहे. मग त्यांनी घरीच मुलांच्या शिकवण्या घेणं सुरू केलं. काही काळानंतर त्यांनी त्यांची मुलगी तन्वी जिथं शिकत होती त्याच शाळेत अर्ज केला. तिथे तात्पुरत्या स्वरूपात शिकवण्याची संधी त्यांना मिळाली. डॉक्टरेट असलेल्या दर्शना आपल्या करिअरची एका अर्थाने पुन्हा सुरुवात करत होत्या. जेवढे दिवस शिकवणार त्या दिवसांचा पगार मिळणार. एक वर्ष असं काढल्यानंतर पूर्णवेळ शिकवण्याची संधी मिळाली.

‘‘ महाविद्यालयात शिकवणं आणि शाळेत शिकवणं खूपच वेगळं असतं. शाळेत मला डेमो क्लास घ्यावा लागला. तो जेव्हा नीट झाला तेव्हा मला संधी मिळाली. पर्यायी शिक्षक म्हणून मी इथे सुरुवात केली ’’ डॉक्टर दर्शना सांगतात.

पण हे करिअर त्यांनी पुन्हा एकदा स्थिर केलं. आधी पर्यायी शिक्षक मग पुढं तात्पुरत्या पदावरचा शिक्षक म्हणून काम, पुढं पूर्ण वेळेचे विज्ञान शिक्षक म्हणून त्यांना संधी मिळाली. पुढे त्या विज्ञान विभागाच्या प्रमुख झाल्या. त्यानंतर सीनिअर डायरेक्टर ऑफ हायस्कूल म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली आणि आता सीनिअर डायरेक्टर ऑफ सेकंडरी डिव्हिजन म्हणून त्या काम करत आहेत. खरंतर आपलं स्थिरस्थावर झालेलं करिअर सोडणं सोपं नाही. पण नव्यानं सुरुवात करून आज डॉक्टर दर्शना यांनी यश मिळवलं आहे. त्यांच्याच शब्दात " शिकवणं ही माझी आवड आहे आणि मी मुलांमध्ये रमते. आणि मी तेच करतेय त्यामुळे मला समाधान मिळत आहे"

kulkarnee.prachee@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT