Indian cinema
Indian cinema esakal
सप्तरंग

"बस्स...रुकना नहीं चाहता...!"

सकाळ वृत्त सेवा

अमर अकबर अँथनी रिलीज होऊन आठवडा झाला होता. पण शिऱ्या आणि त्याच्या गँगला अजुन तिकिटे मिळत नव्हती. रोजचे चारही शो हाऊसफुल्ल. अखेर आज त्यांनी मनावर घेतलेच. पहाटपासुनच टॉकिजवर जाऊन बसले, तेव्हा कुठे त्यांना दहा तिकिटे मिळाली.

रात्रीच्या लास्ट शो ला ते जेव्हा टॉकिजवर आले तेव्हा सिनेमा नुकताच सुरु झाला होता. आपले सीटस् शोधुन ते जागेवर बसले. सातशे आठशे चेअर्स असलेले ते थिएटर गच्च भरले होते. मधल्या रो मध्येही माणसं पाय लांब करुन बसली होती. अमिताभच्या एंट्रीला तर हॉल शिट्ट्या टाळ्यांनी दुमदुमुन गेला.

'परदा है परदा..'कव्वाली सुरु झाली. शेवटच्या कडव्यात अमिताभ हातात फुल़ांचा हार घेऊन नाचत स्टेजवर येतो. तेंव्हा तर सगळं थिएटरच नाचु लागलं...सलग तीन तास एका वेगळ्याच माहौल मध्ये सगळं थिएटर गेलं होतं.

त्या दिवशी शिऱ्याच्या घरी व्हिसीआर आणायचा प्लॅन होता. आधी त्याच्या लग्नाची कैसेट पहायची. आणि मग 'धुमधडाका' पहायचा.

चौकातल्या टपरीतुन एका मोठ्या बॅगमध्ये घालुन व्हिसीआर आणला. त्याच्यासोबत बऱ्याचशा वायरी...पिना, घरी आणल्यावर तो टीव्हीला जोडण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत वाड्यातली बरीच चिल्लीपिल्ली जमली होती. शिऱ्याच्या लग्नाची कॅसेट लावली. बराच वेळ तर नुसत्या मुंग्या मुंग्याच दिसत होत्या. अखेर जेव्हा लग्नपत्रिका टीव्हीच्या पडद्यावर दिसली...तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले.

तासाभराने 'धुमधडाका' ची कॅसेट लावली. पंचवीस तीस जणांनी अख्खं घर भरलेलं. आणि मिनीटा-मिनीटाला हास्याचे फवारे. अशोक सराफ म्हाताऱ्याच्या वेशात आल्यानंतर तर बघायलाच नको. नुसतं...इह्ही...उह्हु...आह्हा...

रविवार सकाळपासुनच शिऱ्याच्या आईबाबांना वेध लागले होते. 'साप्ताहिकी' मध्ये सांगितलं होतं...या रविवारी रमेश देव, सिमाचा 'सुवासिनी' दाखवणार म्हणून. घरी सगळ्यांना एकत्र बसुन आज पिक्चर पहायचा होता. आईने सकाळीच ठरवलं होतं, रात्री फक्त खिचडी करणार म्हणुन. संध्याकाळी सात वाजता 'सुवासिनी' सुरु झाला. आणि सगळेच वेगळ्या जगात गेले. रमेश देव...सीमाचा आभिनय...त्यातील गाणी...

'सांग कधी कळणार तुला...' हे गाणं तर बाबांचं फेव्हरेट. घरातीलच पाचही जण तल्लीन होऊन पिक्चर एंजॉय करीत होते.

मिहीरचा आज अजिबात मुड नव्हता. खुप नर्व्हस झाला होता तो. सगळीकडुनच निराशा त्याच्या वाटेला आली होती. एकटाच बसला होता रुममध्ये. मोबाईलवर 'ये जवानी..ये दिवानी' बघत. पिक्चर बघता बघता हळुहळु त्याचा नर्व्हसपणा कमी होत गेला. आणि...

...आणि रणबीर कपुरचा तो डायलॉग त्याला खुप भावला. पुन्हा पुन्हा तो सिन पाहु लागला. ऑफिसमध्ये झालेला अपमान. सगळंकाही विसरला तो. कारण रणबीर म्हणत होता..

22 तक पढाई..

25 तक नौकरी..

26 तक छोकरी..

30 पे बच्चे..

60 पे रिटायरमेंट..

और फिर मौत का इंतजार

धत् ऐसी घिटीपिटी लाईफ थोडी जीना चाहता हुं मै!

मैं उडना चाहता हुं..

दौडना चाहता हुं..

गिरना भी चाहता हुं..

बस्स..

रुकना नही चाहता..

वर्षामागुन वर्षे गेली. सातशे आठशेच्या गर्दीत बसुन पिक्चर पहाणारी एक पिढी...आता एकट्याने पिक्चर पाहु लागली. चित्रपटाचा पडदाही लहान होत गेला. पण त्याच्यातुन मिळणारा आनंद... त्याच्यातुन मिळणाऱ्या प्रेरणा या अजुनही तश्श्याच आहेत. म्हणुन तर हातातल्या मोबाईल कडे पहात...'दुनिया मेरी मुठ्ठीमे' म्हणत मिहीर पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवीन आयुष्याला सामोरा जाण्यासाठी तयार झाला.

- सुनील शिरवाडकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT