book review 
सप्तरंग

उद्योगी माणसाची प्रेरक कथा (स्वाती यादवाडकर)

स्वाती यादवाडकर

आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रतिकूलता येत असते; पण आपल्या उत्तम अशा जीवनमूल्यांच्या आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्या प्रतिकूलतेवर मात करू पाहणारी माणसं खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असतात, इतरांनाही दिशा दाखवतात, प्रेरणा देतात, मग ती माणसं सर्वसामान्य का असेनात! बाळकृष्ण जोशी यांची कथा अशीच आहे. सामान्य माणसाची गोष्ट असली तरी वाचून पाहिलीच पाहिजे अशी ही प्रेरक कथा आहे. लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वांची चरित्रं आपण नेहमीच वाचत असतो. त्यांचा आदर्शही ठेवू पाहतो; पण सर्वच माणसं असामान्य होऊ शकत नाहीत. मात्र, तरीही सर्वसामान्य जीवन जगणाऱ्यांनाही आपलं आयुष्य परिपूर्ण घडावं असं वाटत असतं आणि ते कसं करता येईल हे या पुस्तकातून नक्कीच टिपता येईल.

शिक्षकी वातावरणात लहानाचा मोठा झालेला बाळ, सावत्र आईच्या त्रासामुळं लहानपणापासूनच खडतर आयुष्य जगत असतो. अनेक हालअपेष्टा भोगूनही तो निराश झाला, तरी हातपाय गाळून नशिबाला दोष देत बसत नाही. उद्यमशीलतेला पोषक वातावरण नसूनही तो उद्योजक होण्यासाठी धडपडतो, प्रयोग करत राहतो. शिक्षण घ्यायची इच्छा असूनही त्यापासून वंचित रहायला लागलं म्हणून आपली ज्ञान मिळवण्याची लालसा सोडून देत नाही. मिळेल तिथून ज्ञानाचे कण टिपत राहतो. आपल्या पत्नीला उद्योजिका बनवतो. मुलांवरही तेच संस्कार करतो. चारही मुलं आपापल्या परीनं या बापमाणसानं दिलेला उद्योजकतेचा धडा गिरवत यशस्वी होऊन दाखवतात. या चार मुलांपैकीच एक आहेत, प्रसिद्ध बालसाहित्यकार मंजूषा आमडेकर. त्यांनीच आपल्या वडिलांचं चरित्र ओघवत्या शब्दात लिहिलं आहे.
सन 1938 मध्ये जन्मलेल्या बाळकृष्ण जोशींनी स्वातंत्र्यापूर्वीचा काळही पाहिला आणि नंतरचाही. ऐंशी वर्षांपूर्वीचा काळ कसा होता याचं हुबेहूब वर्णन या पुस्तकात असं काही सशक्तपणे केलं आहे, की वाचताना आपण नकळत त्या काळात फेरफटका मारून येतो. पुस्तकातले छोटे छोटे गंमतीदार प्रसंग वाचताना मजा वाटते. माणसाच्या स्वभावाचे असंख्य पैलू आणि कंगोरे कोणत्याही काळात कसे ठळकपणे दिसून येतात याचंही बारकाईनं निरीक्षण करून चित्रण केलेलं आहे. कोयना प्रकल्पाच्या आणि पोफळी पॉवरहाउसच्या कॉलनीतलं आगळंवेगळं जीवन हुबेहूब डोळ्यापुढे उभं राहतं आणि निराळ्याच वातावरणात घेऊन जातं; पण पार्श्वभूमीवर या सगळ्या घटना घडत असतानाही बाळकृष्ण जोशी यांचा लढा कसा ठसठशीत होता हे जाणवल्याखेरीज राहत नाही.
 
कुठलंही पाठबळ नसताना नानाविध व्यवसाय करून पाहणाऱ्या बाळकृष्ण जोशींनी अनेक उत्पादनांची निर्मिती, छंद, बागकाम, फोटोग्राफी, पाककला, वेगवेगळी मशिन्स करून पाहणं, वास्तुशास्त्र अभ्यास, चित्रकला, हस्तकला...अशा अनेक प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. ऐंशी वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या उद्योगांची नुसती यादी वाचूनही थक्क व्हायला होतं. आठ वर्षांच्या बालकापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकानं आदर्श घ्यावा असं हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व. ऐंशी वर्षाच्या या तरुणाची ही प्रेरक कथा आजच्या स्टार्टअप युगातल्या नवीन पिढीला, उद्योगजगतात भरारी घेऊ पाहणाऱ्या तरुणाईला दीपस्तंभासारखी वाट दाखवत राहील आणि "आता वय झालं' असं म्हणणाऱ्या माणसालाही "एज इज जस्ट अ नंबर' असंही ठामपणे सांगेल अशीच आहे.

पुस्तकाचं नाव : ऐंशी वर्षाच्या तरुणीा प्रेरक कथा : "बाप'माणूस
लेखिका : मंजूषा आमडेकर
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस, पुणे
पानं : 116, मूल्य : 175 रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

हॉलिवूड हादरलं ! हॅरी मेट सॅली फेम प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT