सप्तरंग

जरा विचारा अंतर्मनाला.....

विवेक विठ्ठल कोतेकर

व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागतेच. मग ती समस्या आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो. आपण आता स्पर्धेच्या युगात जगत आहोत. इथे टिकण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करीत आहे. आपली समस्या हीच आहे, की याच स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःला सक्षम बनविण्याविषयीची. जी व्यक्ती सक्षम असेल, तत्पर असेल, महत्त्वाचे म्हणजे हार्ड वर्क व स्मार्ट वर्क या दोन्हींचा परस्परसंबंध समजून घेऊन काम करणारी असेल तीच व्यक्ती आज जगात टिकणार आहे.

इथे प्रत्येक समस्येला उत्तर हे आहेच; पण मुळात प्रश्‍नच हा आहे, की समस्येवर उत्तर मिळविण्यासाठी आपण कोणाकडे जातो? साधारणतः तीन गोष्टींचा विचार अनेक जण करताना आढळून येते. एकतर नातेवाईक किंवा जाणकार तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेतात किंवा ज्योतिष सल्ला घेतात किंवा देवाला शरण जातात. पण, या मार्गातून आपल्याला योग्य आणि प्रभावी मार्गदर्शन किंवा उत्तर मिळेलच, याची शाश्‍वती नसते. मग यापेक्षा प्रभावी असा मार्ग कोणता? तो आहे आपले अंतर्मन. जे आपल्याला प्रत्येक समस्येतून सहीसलामत बाहेर काढते.

नेपोलियन बोनापार्टसमोर जेव्हा अवघड युद्धप्रसंग येई, तेव्हा त्याला सैन्याची व्यूहरचना कशी लावावी हे समजत नसे. अशा वेळी तो आपल्या अंतर्मनाला आज्ञा देत असे, ‘हे अंतर्मना, मला योग्य उत्तर दे.’ आणि अंघोळ करून झोपी जात असे. ज्यावेळी तो जागा होई, त्यावेळी त्याचे उत्तर त्याला मिळालेले असे. 
कॅनडाचे प्रसिद्ध डॉक्‍टर फेडरिक बेंटिंग हे मधुमेही रोग्यांच्या बाबतीत खूप काळजी करीत. कारण, मधुमेहावर कोणताच औषधोपचार नव्हता. त्यांनी हे औषध शोधण्यासाठी खूप अभ्यास केला. संशोधन केले. पण यश येत नव्हते. शेवटी अंतर्मनाला त्यांनी सूचना दिली. अंतर्मनाने ताबडतोब प्रतिसाद दिला आणि कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या संप्रेरकाचा प्रयोग रोग्यावर करण्याची सूचना त्यांना मिळाली. 

म्हणून मंडळी, जीवनात कोणत्याही क्षेत्रात समस्या आली असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, त्या वेळेला अंतर्मनाकडे जावे. ते आपल्याला कधीच निराश करणार नाही. अंतर्मन आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. महत्त्वाचे म्हणजे ते २४ तास आपल्याबरोबर असते. फक्त त्याची एक अट असते, ती म्हणजे ते स्वतःहून आपली मदत करीत नाही. आपण त्याला विचारले पाहिजे, याचा वापर आपण कसा करायचा? हे शास्त्रीय पद्धतीने शिकून घेतले पाहिजे.

kotekar.vivek37@gmail.com 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

MLA Rohit Pawar : औद्योगिक कंपन्यांच्या क्षेत्रात दादागिरी नेमकी कोणाची?

IND vs ENG 5th Test: भारताने रचला विजयाचा पाया; यशस्वी जैस्वालच्या शतकाने इंग्लंडची भंबेरी, उभं केलं गाठता न येणारं लक्ष्य

Local Viral Video: लोकल तिकीट तपासणी मोहिमेला हिंसक वळण; प्रवाशाचा रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला; व्हिडीओ व्हायरल

Uddhav Thackeray : निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत; उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT