Omlet 
सप्तरंग

ऑम्लेट - परफेक्ट ब्रेकफास्ट

नेहा मुळे

वीकएंड हॉटेल - नेहा मुळे
श्रावण, गौरी-गणपतीसोबतच आता नवरात्रही संपले आहेत. अनेकांनी या दिवसांमध्ये असलेल्या श्रद्धेमुळे नॉन-व्हेज खाण्यावर नियंत्रण ठेवलेले असते. दिवाळीलाही अजून काही दिवस बाकी आहेत. गोड फराळ करायच्या आधी आपण थोडासा नॉन-व्हेजवर नक्कीच ताव मारू शकतो. आज अगदी हार्डकोर नॉन-व्हेजबद्दल बोलत नाही. यामध्ये आपण अंड्यापासून सुरवात करू शकतो. अंडे म्हटले की, सर्वांत पॉप्युलर डिश म्हणजे ऑम्लेट! ऑम्लेट ही एक परफेक्ट ब्रेकफास्ट डिश आहे. बनवायला एकदम सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही डिश, पण आता या ऑम्लेटचेही अनेक प्रकार आहेत. आज पाहूयात पुण्यामध्ये कुठे-कुठे चांगल्या ऑम्लेटची चव चाखता येते. तशी मस्त ऑम्लेट मिळणारी ठिकाणे खूप आहेत. त्यापैकी काही निवडक ठिकाणे खाली नमूद केली आहेत.

१.    वोहुमान कॅफे (रुबी हॉल क्लिनिकजवळ) : येथील बन मस्का आणि चहा प्रसिद्ध आहेच, पण त्याहून जास्त प्रसिद्ध आहे चीज ऑम्लेट! रोज इथे शहराच्या कानाकोपऱ्यातून चाहते चीज ऑम्लेट खायला येतात. ऑम्लेटमध्ये अक्षरशः चीजचे मोठे मोठे तुकडे घातलेले असतात आणि त्याने ऑम्लेटची चव अधिकच वाढते. एवढे चीज म्हटल्यावर अर्थातच हे ऑम्लेट अत्यंत पोटभरीचे ठरते.

२.    योकशायर (अनेक शाखा) : वेगवेगळे अंड्याचे प्रकार मिळणारी हे रेस्टॉरंट आहे. इथे ऑम्लेटचे अनेक प्रकार चाखायला मिळतात. त्यापैकी चीजी श्रुम, फार्महाउस फीस्ट आणि अमेरिकन ड्रीम हे ऑम्लेटचे प्रकार नक्की टेस्ट करायला हवेत. विशेष म्हणजे, या ऑम्लेटसोबत २ साईड डिशची निवड ही तुम्ही करू शकता. जसे की, हॅश ब्राऊन, बेक्ड बीन्स, फ्रेंच फ्राईज इत्यादी.

३.    राजू ऑम्लेट (सिंहगड रोड आणि विमाननगर) : बडोद्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या राजू ऑम्लेटच्या शाखा पुण्यातही सुरू झालेल्या आहेत. बटरचा अक्षरशः मारा असलेले ऑमेल्ट्स इथे मिळतात. बटर क्रश ऑम्लेट आणि बटर ग्रीन चीज ऑम्लेटची चव घेण्यासारखी आहे. हे पोटभरीचे आहे, हे वेगळे सांगायला नको. 

४.    दी इराणी कॅफे (अनेक शाखा) : नावाप्रमाणेच परफेक्ट इराणी व्हाईब असलेल्या या कॅफेत अर्थातच अंड्याचे अनेक प्रकार मिळतात. येथील मसाला चीज टोस्ट ऑम्लेट, चिकन चीज ऑम्लेट खास आहेत.

५.    व्हेर एल्स कॅफे (विमाननगर) : दररोज ब्रेकफास्ट मिळणाऱ्या या जागेत अनेक अंड्याच्या डिशेस मिळतात. इथे बेकन ऑम्लेट, मेडिटेरेनिअन ऑम्लेट आणि स्पॅनिश ऑम्लेटची चव चाखण्याजोगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

SCROLL FOR NEXT