yogesh kangude
yogesh kangude 
सप्तरंग

घरालाही बनवू 'स्मार्ट' (योगेश कानगुडे)

योगेश कानगुडे

एकीकडं सगळ्याच गोष्टी "स्मार्ट' होत असताना घरानं मागं का राहावं? तंत्रज्ञानाच्या मदतीमुळं आता घरंही "स्मार्ट' होऊ लागली आहेत. "स्मार्ट होम्स'मध्ये दिवे कुठूनही नियंत्रित करण्यापर्यंत बाहेरून घरावर देखरेख करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतात. या घरांवर एक दृष्टिक्षेप.

इसवीसन 2020 पर्यंत जगात जवळपास पन्नास अब्जांपेक्षा अधिक लोक हे वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातील, असा अंदाज आहे. यामध्ये आपले स्मार्ट फोन, घरातली उपकरणं, कार यांच्याबरोबर आपल्या नेहमीच्या जगण्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. "इंटरनेट ऑफ थिंग्ज'चा उदय झाल्यापासून जग मोठ्या प्रमाणावर इंटरकनेक्‍टेड झालं आहे. यात भर पडली आहे ती "स्मार्ट होम्स'ची. आयओटी आणि "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' वापरून "स्मार्ट कुलूप', "स्मार्ट पंखा', "स्मार्ट दिवे' यांच्या निर्मितीला सुरवातही झालेली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असलेली ही "स्मार्ट' उपकरणं आता तंत्रज्ञानामुळं प्रत्येकाच्या घरात दिसू शकतील. म्हणजेच स्मार्ट फोनधारकांना आपल्या घराचं "नियंत्रण' कुठूनही करता येणं सहजशक्‍य होणार आहे.

आता "स्मार्ट होम' म्हणजे नेमकं काय? "स्मार्ट होम' म्हणजे आपलं घर पूर्णपणे स्वयंचलितरित्या नियंत्रित करणं. आपल्या घरातले दिवे, टीव्ही, एसी हे आपण आपला फोन किंवा कॉंप्युटर, टॅब्लेट यांच्याद्वारे एकमेकांशी जोडणं. या प्रक्रियेला "होम ऑटोमेशन' असं म्हटलं जातं. "होम ऑटोमेशन' म्हणजे थोडक्‍यात एका क्‍लिकवर तुमच्या घरातले दिवे सुरू होणार आणि बंदही होणार. यामध्ये घरमालकांचं घरातलं लोकेशन सिस्टिमला माहीत असल्यामुळं मालकाच्या लोकेशननुसार ऑटोमॅटिक उपकरणं सेट केली जातात. आणखी उदाहरण द्यायचं झालं, तर तुम्ही बाहेर गेले असताना तुमच्याकडं कुणी पाहुणे आले, तर तुम्ही घरी नसतानादेखील तुमचं "स्मार्ट होम' पाहुण्यांचं स्वागत करायला सज्ज असेल. कारण घरी आलेल्या त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी घराचे दरवाजे तुम्ही कुठूनही उघडू शकता! घरी पाहुणा म्हणून आलेल्या त्या व्यक्तीनं घरासमोर बसवलेल्या मशिनवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्यानं हात ठेवल्यास त्या व्यक्तीच्या हाताचे ठसे तुमच्या स्मार्ट फोनवर दिसतील. त्याच स्मार्ट फोनवरून तुम्ही त्या व्यक्तीची ओळख पटल्याची आज्ञा दिल्यास घराचे दरवाजे त्या व्यक्तीसाठी उघडले जातील! स्मार्ट होममध्ये तुम्ही खालील गोष्टी नक्की करू शकता.

"स्मार्ट लायटिंग' ः "स्मार्ट होम'मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लायटिंग. या संकल्पनेसाठी तुम्हाला घरात स्मार्ट दिव्यांची आवश्‍यकता आहे. लायटिंग कोणत्याही एका उपकरणाच्या माध्यमातून नियंत्रित करता येतं. दिव्यांचा ब्राइटनेस घराच्या कलरनुसार कमी जास्त करू शकता. याशिवाय तुम्हाला रात्री कोणता दिवा हवाय, किती वेळ हवाय, संध्याकाळी कुठले दिवे, किती वाजता सुरू झाले पाहिजेत याचं सेटिंगही करू शकता. या सगळ्या कामासाठी तुम्ही घरातच असला पाहिजेत असं नाही.

"स्मार्ट सर्व्हेलन्स कॅमेरा' ः घराच्या दरवाजावर आणि लहान मुलांच्या रूममध्ये कॅमेरा असणं आता काळाची गरज बनत चालली आहे. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा आपल्याला मदत करतात. आपण आपल्या स्मार्ट फोन किंवा टॅब्लेटद्वारे कॅमेरा ऑपरेट करू शकतो; तसंच रेकॉर्डिंग्जही पाहू शकतो.

एसी ः यासाठी आपल्याला वेळ निश्‍चित करावी लागते. जर आपण कामावरून घरी जर सात वाजता येत असू, तर सेटिंग अशा पद्धतीनं करायचं, की घरात आल्यावर आपल्याला थंड हवा मिळू शकते. कामावरून परतण्यास उशीर होणार असेल, तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणाहूनसुद्धा एसीची वेळ बदलू शकतो.

"स्मार्ट किचन' ः तंत्रज्ञान हे परिपूर्ण स्वयंपाक तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत अजून पोचलेलं नाही; परंतु किचनमधल्या काही गोष्टी तंत्रज्ञानामुळं सोप्या झाल्या असून, वेळेत बचत होत आहे. बाजारात कॅमेरा आणि डिजिटल थर्मामीटरनं सज्ज असे "स्मार्ट ओव्हन' उपलब्ध आहेत. त्यामुळं अन्न शिजण्यापर्यंत आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तसंच स्मार्ट रेफ्रिजरेटर्स आपल्या फ्रिजमधलं गाजर खराब झाल्याची माहिती देतात. ते नष्ट करण्यासाठी अनेक पर्याय देतात. एलजी कंपनीचा स्मार्ट फ्रिज तर ओव्हनला स्वयंपाकाच्या सूचनादेखील पाठवतो. आजकाल थ्रीडी फूड प्रिंटरही उपलब्ध आहेत. तुम्हाला ते गिटारच्या आकाराचा पास्ता तयार करण्यास मदत करतात.

आता प्रश्न आहे तो किंमतीचा. या सगळ्या सुविधा पाहिजे असतील, तर हे फारच महाग प्रकरण असेल, असा आपला समज झाला असेल; पण असं काही नाहीये. आजकाल बऱ्याच कंपन्यांची या संदर्भात पॅकेजेस असतात. त्यामुळं आपण परवडेल असं पॅकेज निवडून आपलं घर स्मार्ट बनवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT