12 cent pay hike to employees of Sahyadri sugar factory
12 cent pay hike to employees of Sahyadri sugar factory sakal
सातारा

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना १२ टक्‍के पगारवाढ

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२ च्या पगारापासून १२ टक्‍के पगारवाढ लागू करण्यात आली. त्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष व सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि कारखान्याचे संचालक युवा नेते जशराज पाटील यांचा सह्याद्री साखर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून आभार मानले.

राज्‍यातील साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी १२ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार, कारखाना प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये सलोखा घडवून आणून त्रिपक्षीय समितीची स्‍थापना करण्यात आली होती. उभय पक्षामध्ये सखोल चर्चा होऊन सामंजस्य करार करण्यात येऊन संबंधित सदस्यांच्या स्‍वाक्षरीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. याबाबत शासनस्‍तरावर सकारात्‍मक विचार विनिमय होऊन त्रिपक्षीय समितीने शासनास सादर केलेल्‍या अहवालामध्ये नमूद केलेल्‍या सर्व शिफारशींच्या अनुषंगाने केलेल्‍या करारनाम्‍याची तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत २९ ऑक्‍टोबर २०२१ रोजी झालेल्‍या शासन निर्णयानुसार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने कारखान्यातील कर्मचाऱ्यांना १२ टक्‍के वेतनवाढ लागू केलेली आहे.

ही वेतनवाढ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आली. त्याबद्दल सह्याद्री साखर कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, आर. जी. तांबे, प्रताप चव्हाण, अप्पासाहेब साळुंखे, बलराज पाटील, प्रकाश पवार, अशोक नलवडे, रमेश जाधव, प्रकाश यादव, पृथ्‍वीराज सोनवणे, दयानंद गोरे, विजय यादव, रामचंद्र जगताप, बाबासाहेब चव्हाण, संभाजी चव्हाण, बाळासाहेब माळवे आदींनी कारखान्याचे अध्यक्ष सहकारमंत्री पाटील, संचालक युवा नेते जशराज पाटील यांचा सत्‍कार करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT