Heavy Rain in Khatav
Heavy Rain in Khatav esakal
सातारा

मुसळधार पावसामुळं शेळ्या-मेंढ्यांचा गारठून जागीच मृत्यू

राजेंद्र शिंदे

रात्रभर शेळ्या-मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळं चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामळं गारठून त्यांचा प्राण गेला.

खटाव (सातारा) : खटाव (Khatav) परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने (Heavy Rain) मेघलदरे वाडी (ता. खटाव) येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या लहान मोठ्या अशा एकूण 15 शेळ्या-मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार झाल्याची घटना घडली. या पूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. संबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की मेघलदरे वाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्यामेंढ्या चारून आणून घराशेजारील अंगणात बांधल्या होत्या. दरम्यान, रात्री अकराच्या सुमाास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कुमार व कुटुंबीयांची तारांबळ उडवली. पाऊस एवढा प्रचंड होता, की कुटुंब सहजासहजी घराबाहेर पडूच शकत नव्हते, तरीही जीव धोक्यात घालून जवळपास मिळेल तिथं शेळ्या-मेंढ्या सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न मदने व कुटुंबीयांनी केला. मात्र, तोपर्यंत शेळ्यामेंढ्या खूप गारठल्या होत्या. परिणामी, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मदने यांनी सांगितले.

दरम्यान, पशुपालक बाळू मदने यांनी सांगितलं, की रात्रभर शेळ्या व मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळे चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामळे गारठून त्यांचा प्राण गेला. दरम्यान, परिसरात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळं शेतीला मोठा फटाका बसला आहे. रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळं ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता शेतरीवर्गामधून व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, India vs Ireland: टीम इंडियाची विजयी सलामी, आयर्लंडला केलं चारीमुंड्या चीत; कर्णधार रोहितचे शानदार अर्धशतक

Rohit Sharma: रोहितचा टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम; विराट-बाबरच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वचे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

Modi Cabinet: श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धर्यशील मानेंना केंद्रात मंत्रीपदं मिळणार - सूत्र

INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT