19 students of Mazeri Primary School of Satara Zilla Parishad have appeared in the merit list in the pre upper primary scholarship examination
19 students of Mazeri Primary School of Satara Zilla Parishad have appeared in the merit list in the pre upper primary scholarship examination 
सातारा

माझेरी जिल्हा परिषद शाळेचे 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

शशिकांत साेनवलकर

दुधेबावी (सातारा) : सातारा जिल्हा परिषदेच्या माझेरी (पुनर्वसन) प्राथमिक शाळेचे 19 विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत असून, दोन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत विश्वराज पोमणे 266 (नववा) व विश्वजित मदने 264 (दहावा) यांची निवड झाली असून, ते राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

जिल्हा गुणवत्ता यादीत अनुराग शिंदे (262), जय शिंदे (258), समृद्धी नाळे (256), विश्वनील महामुनी (250), श्रावणी फरांदे (244), रोशनी नाळे (244), निरंजन पानसरे (242), ओंकार नाळे (242), वेदिका भोसले (240), ओम कोकरे (238), दिव्यम लंगुटे (234), श्रावणी नाळे (232), रणजित निंबाळकर (232), सिद्धी धर्माधिकारी (230), श्रेयस नेरकर (228), प्रणव लोखंडे (226), गौरव जगताप (226) या विद्यार्थ्यांची निवड झाली. माझेरी शाळेतील 36 पैकी 19 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. 

विद्यार्थ्यांना भोलचंद बरकडे व गणेश पोमणे यांनी मार्गदर्शन केले. तत्कालीन मुख्याध्यापिका सुषमा आडके, अशोक मिसाळ, सरस्वती भोईटे, विकास भगत, सिंधू मदने यांचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, रेखा खरात, डॉ. बाळासाहेब शेंडे, अमिता गावडे, रमेश गंबरे, चनय्या मठपती, सुनंदा बागडे, मनीषा दिघे, प्रवीण दिघे, ज्ञानेश्वर दिघे, गणेश दिघे, मीनाक्षी कोरडे, किसनराव दिघे, राघू दिघे, बाळू दिघे, दत्ता पवार, विष्णू दिघे, अर्जुन दिघे, मारुती सणस, हनुमंत कोकरे, विनायक राऊत, राजेंद्र बनकर, शिवाजी शेंडे, कांतीलाल गाढवे, मधुकर पवार, बशीर शेख, संजय नाळे आदींसह ग्रामस्थ, पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT