Ration Card Adhar card link Sakal
सातारा

पुरवठा विभागाकडे २५ हजार अर्ज प्रलंबित

सर्व्हर डाउन; पुरवठा विभागाचे कर्मचारी रोषाला कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

सातारा - रेशनकार्ड आधारकार्डशी लिंकअप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण, सर्व्हर डाउन असल्याने गेल्या तीन- चार महिन्यांपासून ही कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यातील विविध कामांचे २५ हजार अर्ज पुरवठा विभागाकडे पडून राहिले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारचा सर्व्हर स्वतंत्र असल्याने त्यामध्ये डाटा अपलोड करताना काही तरी चुकीचा प्रकार झाल्याने याचा पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेशनकार्डधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या आधारकार्ड व रेशनकार्ड लिंकअप झालेल्यांनाच धान्य दिले जात आहे. नावे कमी करणे, नाव बदलणे, मृतांची नावे कमी करणे आदी कामेही या सर्व्हरच्या माध्यमातून केली जातात. पण, गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंत्रालयातील पुरवठा विभागाचा सर्व्हर बंद असल्याने आधार लिंकअपची कामे रखडली आहेत. जिल्ह्यातील तब्बल २५ हजार विविध अर्ज पुरवठा विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्यांचे लिंकअप झालेले नाही, अशा रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नाही. त्यामुळे पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या आधारकार्ड रेशनकार्डशी लिंकअप करताना केंद्राचा सर्व्हर व राज्याचा सर्व्हर अशी डेटाची देवाण-घेवाण होते. त्यातूनच लिंकअपची प्रक्रिया होते. पण, गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंत्रालयातील सर्व्हर बंद असल्याने जिल्ह्यातील लिंकअपसह विविध कामे रखडली आहेत. सध्या जिल्ह्यातील २५ हजार नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत.

गेल्या तीन- चार महिन्यांपासून सर्व्हर डाउन असल्याने पुरवठा विभागाची सर्व ऑनलाइन कामे रखडली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर पुन्हा चालू झाला आहे. तसेच त्याचे स्पीडही चांगले मिळत असल्याने प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील.

- स्नेहा देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT