Koyna Dam Patan Satara esakal
सातारा

Koyna Dam : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; कृष्णा-कोयना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली आहे.

हेमंत पवार

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कऱ्हाड : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून कोयना नदीत होणारा ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर आहे. त्यामध्ये आज दुपारी १२ वाजता करण्यात येणारी १० हजारांची वाढ पाऊस कमी झाल्याने थांबवण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठच्या (Krishna-Koyna River) गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युसेक सोडण्यात आले.

कोयना धरणातील पाण्याची आवक ८५ हजार क्यूसेकवर होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणातून पाणी सोडण्याच्या क्षमतेते वाढ करुन आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता पुन्हा १० हजार क्यूसेकने पाणी वाढवण्यात येणार होते. मात्र, आज दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कोयना धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजता वाढवण्यात येणारा १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.

त्यामुळे कोयना धरणातून पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेले एक हजार ५० क्युसेक आणि धरणाच्या दरवाजातून सोडण्यात आलेले ३० हजार क्युसेक असे ३१ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नदीकाठच्या पूरबाधित गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनाने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT