Police Medal
Police Medal Sakal
सातारा

सातारा जिल्‍ह्यातील 31 उपनिरीक्षकांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍या

गिरीश चव्हाण

संबंधितांना नवनियुक्‍तीच्‍या ठिकाणी तत्‍काळ हजर राहण्‍याच्‍या सूचना करण्‍यात आल्‍या आहेत.

सातारा: प्रशासकीय, तसेच इतर तांत्रिक कारणास्‍तव पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल यांनी जिल्‍हा पोलिस दलातील ३१ उपनिरीक्षकांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍या केल्‍या आहेत. याबाबतचे आदेश त्‍यांनी जाहीर केले असून, त्‍यानुसार संबंधितांना नवनियुक्‍तीच्‍या ठिकाणी तत्‍काळ हजर राहण्‍याच्‍या सूचना करण्‍यात आल्‍या आहेत.

उंब्रज पोलिस ठाण्‍यातील उपनिरीक्षक मोहन तलवार यांची ढेबेवाडी येथे, शिरवळ येथील कृष्‍णराव पवार यांची वाई येथे, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील भीमराव यादव यांची सातारा तालुका येथे, सातारा शहर पोलिस ठाण्‍यातील विश्‍‍वास कडव यांची अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक यांचे वाचक म्‍हणून, लोणंद येथील गणेश वाघ यांची स्‍थानिक गुन्‍हे शाखा येथे, तर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्‍यातील भैरीनाथ कांबळे यांची कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात बदली करण्‍यात आली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्‍यातील संजय बोंबले यांची वाठार येथे, शाहूपुरी येथील संदीप शितोळे यांची पुसेगाव येथे, सातारा शहर येथील प्रशांत बघे यांची औंध येथे, वाठार येथील स्‍वप्‍नील धोंगडे यांची पोलिस अधीक्षकांच्‍या वाचकपदी, नियंत्रण कक्षातील परशुराम कोरके, संतोष तासगावकर यांची सातारा शहर येथे, नियंत्रण कक्षातील सखाराम बिराजदार यांची कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे, दत्तात्रय दराडे यांची फलटण ग्रामीण पोलिस ठाण्‍यात, रणजित पठारे यांची आर्थिक गुन्‍हे शाखा बदली झाली आहे.

खंडाळा येथील स्‍वाती पवार यांची लोणंद, कऱ्हाड तालुका येथील अशोक भापकर यांची कऱ्हाड शहर, सातारा शहर येथील नानासाहेब कदम यांची शाहूपुरी, शिरवळ येथील सागर आरगडे यांची फलटण ग्रामीण, फलटण ग्रामीण येथील उस्‍मान शेख यांची सातारा शहर, वाठार येथील महेश पाटील यांची उंब्रज, मेढा येथील अजित पाटील यांची मल्‍हार पेठ पोलिस ठाणे, दहिवडी येथील प्रमोद दीक्षित यांची शिरवळ येथे, फलटण शहर येथील संदीप बनकर याची वाठार, कऱ्हाड तालुका येथील राजू डांगे यांची आर्थिक गुन्‍हे शाखा, उंब्रज येथील प्रवीण जाधव यांची कऱ्हाड शहर, कऱ्हाड तालुका येथील उदय दळवी यांची कऱ्हाड शहर, कऱ्हाड शहर येथील भरत पाटील यांची कऱ्हाड तालुका, नियंत्रण कक्षातील श्रीकांत देव यांची सुरक्षा शाखेत, सातारा तालुका येथील मोहन फरांदे यांची पोलिस उपअधीक्षक यांच्‍या वाचकपदी, नियंत्रण कक्षातील पंढरीनाथ पाटील यांची कऱ्हाड शहर पोलिस ठाण्‍यात बदली करण्‍यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT