50 youths adventure training at Manali Zilla Parishad accident shrinivas patil help satara sakal
सातारा

मनालीतील दुर्घटनाग्रस्त तरुणांच्या मदतीसाठी धावले खासदार श्रीनिवास पाटील

खासदार श्रीनिवास पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, सिक्किम हाऊस येथे संबंधितांची राहण्याची व्यवस्था केली

हेमंत पवार

कराड (सातारा) - जिल्हा परिषदेमार्फत मनाली येथे साहसी प्रशिक्षणासाठी पाठवलेले 50 तरुण आणि दोन कर्मचारी मनालीला प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण संपवून परत येताना तेथील मंडी येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात एक कर्मचारी आणि चालक किरकोळ जखमी झाला. ते तरुण आणि कर्मचारी मंडी या ठिकाणावरुन दुसऱ्या वाहनाने दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदार श्रीनिवास पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, सिक्किम हाऊस येथे संबंधितांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी महाबळेश्वर, जावळी, पाटण,सातारा तालुक्यातील50 युवक आणि जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी साहसी प्रशिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात पाठवले होते. त्या ठिकाणचे प्रशिक्षण संपवून स्थानिक खासगी वाहनाने ते तेतून निघाले होते. त्यांच्या ट्रॅव्हल्सला मंडी येथे अपघात झाला. त्यात स्थानिक वाहन चालक गंभीर जखमी झाला तर एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सोडण्यात आले. सर्व कर्मचारीआज दुपारनंतर दिल्लीत पोचले आहेत. त्यांची तेथे राहण्याची सोय महाराष्ट्र सदनात करण्यात येणार होती.

मात्र तेथे एकावेळी सगळ्यांची सोय झाली नाही. त्याची दखल घेऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी काहींची राहण्याची सोय महाराष्ट्र सदनात तर काहीची सोय सिक्कीम हाऊस केली आहे. त्याचबरोबर त्यांना उद्याचे रेल्वेचे तात्काळ रिझर्वेशन मिळावे यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संपर्क साधून खासदार पाटील यांनी 52 मुलांना रेल्वेत जागा मिळावी यासाठी बोगी जोडवी किंवा जास्तीत जास्त मुलांचे तिकीट कन्फर्म करावे यासाठी कळवले आहे. खासदार पाटील यांनी संकटाचा बाका प्रसंग ओळखून सामाजिक बंधीलकीतून तरुणांना केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT