सातारा

गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

- अमोल जाधव

नदीकाठच्या गावांमधील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेठरे बुद्रुक (सातारा): गोंदी व आटके- जाधव मळीनजीकच्या कृष्णा नदी पात्रातील खडकावर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे दुशेरे, आटके, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, खुबी, तसेच मालखेड या नदीकाठच्या गावांमधील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर कृष्णा काठावरील दुशेरे, आटके, मालखेड, कोडोली कार्वे या गावांमध्ये मगरीचे दर्शन झाले. कृष्णा नदीकाठावर एका बाजूस आटके, तर दुसऱ्या बाजूस गोंदी ही गावे वसलेली आहेत. सोमवारी (ता. ३०) तेथील युवक क्रिकेट खेळण्यासाठी नदीकाठावर गेले असताना त्यांना नदीपात्रातील खडकावर मगर दिसली. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी दिलेला नकार, मग कसं झालं लक्ष्मी निवासच्या जान्हवीचं लग्न, दिव्याने सांगितली हटके लव्हस्टोरी

Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल, अनेक मंत्र्यांना डच्चू; शिवसेना- टीएमसीच्या बंडखोर खासदारांची लागणार वर्णी

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! 165 दिवसांतील सर्वात स्वस्त दर; जूनमध्ये 16 हजारांची घसरण; जाणून घ्या आजचा भाव

SCROLL FOR NEXT