सातारा

शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांना 'आधार'; गैरप्रकारांना बसणार चाप!

Balkrishna Madhale

सातारा : विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची दुबार नोंदणी करण्यात आल्यामुळे एकाच विद्यार्थ्याला दुसऱ्यांदा लाभ मिळाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत सर्वच शाळांना कोरोना काळातही आधार नोंदणी करण्याची सक्ती शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र शिक्षण विभागाचे कामकाज सरल प्रणालीतून सुरु झाले आहे. या प्रणालीत नोंदणी करताना विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आवश्यक असल्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या. त्या नोंदी करताना शाळांकडून काही चुकीचे तर काही ठिकाणी एकाच आधार क्रमांकांची दोन वेळा नोंदणी झाल्याने एकाच विद्यार्थ्यांला दोन वेळा लाभ मिळाला आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व शाळांना आधार नोंदणी करण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ देताना शासनाकडे लाभास अनुदेय विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती शिक्षण विभागाच्या सरल संकेतस्थळावर उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आणि संबंधित लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीत नोंदविणे आवश्यक आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होईपर्यंत आधार नोंदणी करता उपलब्ध असलेल्या पर्यायी व्यवस्थेचा वापर करुन पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि सरलमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे काम शाळांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. अद्यापही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदविणे प्रलंबित आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. या सर्व बाबीवर आळा घालण्यासाठी सर्व मुलांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सरल प्रणालीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आढावा घेण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Odisha Assam Floods: ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार; ७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात

CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

Latest Marathi News Live Update : राधानगरी धरण १०० टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता

Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT