सातारा

गणेश खिंड घाटात कार दरीत कोसळून युवती ठार; सातारा-कास रस्त्यावर अपघात

प्रवीण जाधव

सातारा : सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंड घाटामध्ये काल सायंकाळी भरधाव वेगातील कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील युवतीचा मृत्यू झाला असून, आणखी एक युवती व युवक जखमी झाले आहेत. कोमल बापूराव पाटील (वय 25, रा. बोरखळ ता. सातारा, सध्या रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा) असे मृताचे, तर प्राजक्ता दिलीप साबळे (वय 24), अमर दीपक शिर्के (वय 24, दोघेही रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी) दुपारी हे तिघे कारने फिरण्यासाठी कास पठाराकडे गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते पुन्हा साताऱ्याकडे येत होते. सातारा- कास रस्त्यावरील गणेश खिंड परिसरात आल्यानंतर अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार घाटातून 100 फूट दरीत कोसळली. गाडी घाटातून खाली जाताना अमर व प्राजक्ता हे कारमधून बाहेर फेकले गेले, तर गाडी थांबलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर कोमल पडली होती. अमर व प्राजक्ता हे दोघे दरीतून कसे तरी वर आले. कठड्यावर बसलेल्या अवस्थेत त्यांना साताऱ्यातील काही युवकांनी पाहिले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्याबरोबर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.

दोन्ही जखमींना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ गेले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकरच्या युवकांना बोलावले. ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन कोमलचा मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. तेथे तिचे नातेवाईक व शेजारी जमले होते. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT