सातारा

प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड : सयाजी शिंदेंची संकल्पना

Balkrishna Madhale

सातारा : प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून 'जय जवान जय किसान' ही नवीन संकल्पना राबवली आहे. साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजी शिंदेंनी बोलून दाखवल्या. दरम्यान, प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा उद्देश समोर ठेवून दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून 'जय जवान जय किसान' ही नवीन संकल्पना आणली आहे. सयाजी यांनी (मंगळवार, ता. २९) वडगाव दडसवाडा या ठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्यासोबत दुष्काळी भागातील माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा यांची सुमारे एक हजार पाचशे झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रुत आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आतापर्यंत वृक्षारोपण केले आहे. त्याचप्रमाणे सैनिकांसाठीची त्यांची तळमळही वारंवार व्यक्त होत असते. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानाची स्मृती जागृत करुन देणारे असल्याच्या भावना सयाजी शिंदे यांनी बोलताना व्यक्त केल्या. देशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. सह्याद्री देवराई नावाने सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष लागवड आणि सर्वधनाची मोहीम हाती घेतली असून राज्यभरात 15 पेक्षा अधिक देवराई प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहेत. बीडपासून जवळच असलेल्या पालवन येथील उजाड डोंगरावर वनराईने नटलेला सह्याद्री देवराई प्रकल्प सयाजी शिंदे, अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके आणि वनविभागाच्या परिश्रमातून उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नेपाळसह भारतात पुन्हा राजेशाही लागू करा'; शं‍कराचार्यांच्या मागणीमुळे चर्चेला उधाण, अल्पसंख्याकांवरही साधला निशाणा

Infosys Buyback: शेअर बायबॅक म्हणजे काय? यासाठी इन्फोसिस खर्च करणार 18,000 कोटी रुपये

Manoj Jarange: ‘जीआर’मध्ये फेरफार केल्यास रस्त्यावर उतरू; मनोज जरांगे यांचा इशारा, भुजबळ कोर्टात गेले, तर आम्हीही आव्हान देऊ

Ahilyanagar Weather Update: 'अहिल्यानगर जिल्ह्यात पाच दिवसांत पावसाची शक्यता'; हवामान खात्याचा अंदाज, ‘यलो अलर्ट’ जारी

Indian Man killed in Texas : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची पत्नी आणि मुलासमोरच निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार केले अन्...

SCROLL FOR NEXT