Adv. Udaysingh Patil Undalkar esakal
सातारा

काकांचे विचार मोडणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू

जगन्नाथ माळी

उंडाळे (सातारा) : विलासकाका जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांच्या साथीने वाटचाल करत आहोत. काकांचे विचार मोडण्याचे षडयंत्र विरोधकांचे सुरू आहे. त्यास आपलेच काही हितचिंतक खतपाणी घालत आहेत. अशा प्रवृत्तींना काकांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी धडा शिकवला आहे. यापुढेही कार्यकर्त्यांच्या साथीने निश्चित धडा शिकवू, असा इशारा रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर (Adv. Udaysingh Patil Undalkar) यांनी विरोधकांना दिला.

विलासकाका जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांच्या साथीने वाटचाल करत आहोत.

शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या (Rayat Co-operative Sugar Factory) कार्यस्थळावर ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकरांच्या (काका) पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे, कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब गरुड, अथणी रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, उपसभापती रमेश देशमुख, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, ॲड. विजय पाटील, सभापती महादेव देसाई, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, रफिकशेठ बागवान, शिवाजीराव जाधव, जगन्नाथराव मोहिते, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंजाबराव देसाई उपस्थित होते.

अॅड. उंडाळकर म्हणाले, ‘‘रयत कारखाना एक वेळ लिलाव होऊन विक्री होतेय की काय अशा अवस्थेत होता. काकांच्या निर्णयामुळे अथणी कारखान्याची करार करून कारखानदारी वाचविण्यात यश आले. ‘रयत’ आज कर्जमुक्त होऊन सभासद व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. येणाऱ्या काळात गाळप क्षमता विस्तार वाढीबरोबर सहवीज प्रकल्प उभारणार आहे.’’ श्री. गोडसे, श्री. जगदाळे, श्री. देशमुख, सर्जेराव थोरात, प्रा. राजेंद्र भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. पुतळा चबुताऱ्याच्या जागेचे पूजन रवींद्र देशमुख यांचे हस्ते झाले. संचालक तुकाराम काकडे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT