Ajit Pawar Ramraje Nimbalkar esakal
सातारा

NCP Crisis : अजितदादा गटाच्या लवकरच होणार पदाधिकारी निवडी; रामराजेंवर मोठी जबाबदारी

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा म्हणून पाहिले जाते.

सकाळ डिजिटल टीम

अजितदादा गटाचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सातारा : राष्ट्रवादीत फूट (NCP Crisis) पडल्यानंतर आता जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. त्यासाठी आगामी तीन- चार दिवसांत याबाबत जिल्ह्यातील त्यांच्या बाजूच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे अजितदादा गटाचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा म्हणून पाहिले जाते. राष्ट्रवादीतील दुफळीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. यातूनच कोण कोणत्या गटासोबत राहणार? याची उत्सुकता निर्माण झाली होती.

मुंबईतील सभेत हे चित्र स्पष्ट झाले असले, तरी जिल्ह्यातील बहुतांशी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे; पण काही जण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळात याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष सुनील माने हे शरद पवार यांच्या गटासोबत राहिले आहेत.

त्यामुळे आता जिल्ह्यात अजित पवार यांच्या गटाचा राष्ट्रावादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाणार आहे. त्यासाठी येत्या दोन चार दिवसांत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अजितदादा यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्षांसह तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, मतदारसंघनिहाय अध्यक्षांची निवड होणार आहे.

त्यामुळे अजितदादा यांच्या गटाचा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाणार? फलटण, जावळी, खटाव तालुक्यांतील पदाधिकाऱ्याला संधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, दीपक चव्हाण यांच्या सूचनेनुसारच या निवडी होणार आहेत.

प्रतिज्ञापत्रामुळे अनेकांची अडचण

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत गेलेल्या काही पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या मनःस्थितीत आहेत; पण प्रतिज्ञापत्रे भरून घेतलेली असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. यातूनही काही तरी मार्ग काढून अनेक जण दादा गटात सहभागी होण्याची चिन्हे आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT