Balasaheb Patil Sakal
सातारा

नोंदविलेला संपूर्ण ऊस गाळप करणार : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

येत्या दिवाळीपूर्वी हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सह्याद्री कारखान्याचे या गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रिक टनांच्या पुढे ऊस गाळप करण्याचे उद्दिष्‍ट आहे.

गजानन गिरी

मसूर - येत्या दिवाळीपूर्वी हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सह्याद्री कारखान्याचे या गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रिक टनांच्या पुढे ऊस गाळप करण्याचे उद्दिष्‍ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस गळीत करणार आहे, असे सहकार, पणन व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यशवंतनगर (ता.कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ या ४८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे ज्‍येष्ठ संचालक सुरेशराव माने यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर, सभापती प्रणव ताटे, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे साखरेला अधिकचा दर मिळावा, यासाठी मागणी करण्यात येणार आहे. या वर्षी सह्याद्री साखर कारखान्यामार्फत जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी ऊसतोड मजुरांसह कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे एकूण १९ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावरील उसाची नोंद गळितासाठी झालेली आहे.’

कोरोना संकटामुळे इथेनॉल प्रकल्पाचे समारंभपूर्वक भूमिपूजन करता आले नाही. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रतिदिन ७,५०० मेट्रीक टनावरून ११,००० मे. टनांपर्यंतच्या ऊस गाळप विस्तारवाढीसाठी मशिनरी खरेदी व उभारणी, सिव्‍हिल बांधकामे यांची ई-टेंडर्स मागवून, ती राज्यस्तरीय मशिनरी खरेदी व राज्यस्तरीय बांधकाम उपसमिती यांच्याकडून फायनल करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्ही. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT