सातारा

पिंपोड्याच्या सरपंचांसह सदस्यांनी साहित्य पळविले? सेवा साेयायटीचा आराेप

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : जिल्हा लोकल बोर्डाची येथील इमारत ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्व परवानगी न घेता पाडली असून, तिचे जुने साहित्य सरपंच व काही सदस्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजीव साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालयानजीक जिल्हा लोकल बोर्डाची जुनी इमारत होती. त्यात प्राथमिक शाळेचे वर्ग भरवले जात. मात्र, कालांतराने ती इमारत जुनी व जीर्ण झाली. ग्रामपंचायतीने कोणाचीच पूर्व परवानगी न घेता ती इमारत पाडली. या इमारतीत ग्रामपंचायतीचे साहित्यही ठेवले होते. इमारतीची निघालेली माती, सागवानी लाकूड, दगडाच्या तोडी तसेच ग्रामपंचायत साहित्याची सरपंच व काही सदस्यांनी वैयक्तिक वापरासाठी घरी नेल्या आहेत. सदर प्रकाराची माहिती श्री. साळुंखे यांनी माहिती अधिकारात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे मागितली असल्याने उचलून नेलेला माल संबंधित व्यक्ती पडलेल्या इमारतीच्या जागी पुन्हा आणून टाकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा करावा.

प्रकरणातील गांभीर्य ओळखा; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या : भाजप महिला आघाडी 

निवेदनासोबत इमारतीत ठेवण्यात आलेल्या व परस्पर गायब करण्यात आलेल्या साहित्याचे फोटोदेखील सादर करण्यात आले आहेत. याबाबत त्वरित चौकशी न केल्यास 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्याचा इशारा श्री. साळुंखे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
 

""इमारतीबाबत सर्व प्रक्रिया रितसर केली आहे. जुन्या साहित्याची विक्री लिलावाद्वारे केली असून, हा निर्णय सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहमतीने घेण्यात आला होता.'' 

- नैनेश कांबळे, सरपंच, पिंपोडे बुद्रुक ग्रामपंचायत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT