सातारा

दिव्यांग, आजारी शिक्षकांना "इलेक्‍शन ड्यूटी' नको; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

पांडुरंग बर्गे

सातारा : कोरेगाव तालुक्‍यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेतील कामात वय 53 वर्षांवरील, तसेच दिव्यांग आणि गंभीर आजार असलेल्या प्राथमिक शिक्षकांना नेमणूक देऊ नये, तद्वत 14 जानेवारी रोजी महिलांचा प्रमुख सण मकरसंक्रांत असल्यामुळे महिला प्राथमिक शिक्षकांनाही निवडणूक कामातून वगळावे आदी मागण्यांचे निवेदन कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोरेगावच्या तहसीलदारांना देण्यात आले. 

शिक्षक समितीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारी 2021 रोजी होणार असल्यामुळे निवडणूक कर्मचारी म्हणून प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक आदेश देऊ नयेत.

ट्रॅक्‍टरखाली चिरडलेल्याचा तहसीलदारांनी वाचविला जीव; एक ठार

14 जानेवारी 2021 रोजी महिलांचा प्रमुख सण मकरसंक्रांत असल्यामुळे महिला प्राथमिक शिक्षिकांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात यावे. वय वर्षे 53 वरील शिक्षक, दिव्यांग आणि गंभीर आजार असणाऱ्या शिक्षकांना निवडणूक काम देऊ नये. तसेच ग्रामपंचायत निवडणूक कामाचा भत्ता त्याच दिवशी रोखीने मिळावा. हे निवेदन शिक्षक समितीचे कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन शिर्के, सरचिटणीस नेताजी जगताप, सहचिटणीस प्रकाश पोळ, संघटक जहांगीर हकीम, विष्णू मदने, सुनील कोकरे यांनी दिले.

ना भंडारा, ना खोबऱ्याची उधळण ; मलवडीत खंडोबाची यात्रा विधिवत साजरी

पाडळीतील हेळजाई देवीची यात्रा यंदा रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT