Chief Minister Uddhav Thackeray esakal
सातारा

खराब हवामानामुळं दौरा रद्द; उद्धव ठाकरे म्हणतात.. मी पुन्हा येईन!

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज कोयनानगर Koynanagar (ता. पाटण) दौऱ्यावर होते. मात्र, खराब वातावरणामुळे त्यांना साताऱ्याचा दौरा रद्द करत परत पुण्याकडे माघारी फिरावे लागले. जोराचा पाऊस (Patan Taluka Landslide), वारा व ढगाळ वातावरणाने दौरा रद्द झाल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला ढगाळ वातावरणाचा चांगलाच फटका बसल्याने त्यांना माघारी फिरावे लागल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले, तरी दौरा रद्द झालेला नाही, असेही शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सातारा दौऱ्यावर येणार आहेत. परंतु, ते कधी येणार याची अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही. (Ambeghar Landslide Chief Minister Uddhav Thackeray Visit To Koynanagar Patan Cancelled bam92)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज कोयनानगर Koynanagar (ता. पाटण) दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 11 च्या सुमारास कोयनानगरच्या दौऱ्यावर येण्यासाठी निघाले होते. मात्र, ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे गेले. मात्र, त्यांच्या या अर्धवट दौऱ्यामुळे येथील स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द झाला नसल्याचे शासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचा आज दौरा असल्याने सकाळपासूनच सर्व विभागांचे अधिकारी कोयनेत ठाण मांडून बसले होते. हेलिकॉप्टर कोयनेत आले व घिरट्या घालू लागले. मात्र, खराब हवामानामुळे ते खाली उतरू न शकल्याने हा दौरा रद्द झाल्याचे शासकीय सूत्रांनी आधी सांगितले. मात्र, दौरा रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने सर्व अधिकारी पावसातच मुख्यमंत्र्यांची वाट पाहत थांबले होते. सध्या कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या अर्धवट दौऱ्यामुळे येथील स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Ambeghar Landslide Chief Minister Uddhav Thackeray Visit To Koynanagar Patan Cancelled bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT