Ancient Inscription esakal
सातारा

साताऱ्यातील वाईत आढळली 13 व्या शतकातील 'गद्धेगळ शिळा'; इतिहासात 'गद्धेगळ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

प्रामुख्याने शिव मंदिराच्या आवारात गद्धेगळ पाहायला मिळते.

भद्रेश भाटे

एखाद्या राजाने दान दिलेली जमीन कोणी बळकावून घेऊ नये आणि ती बळकावून घेऊन राजाज्ञा मोडली, तर त्याची गय करणार नाही, हे दर्शविण्यासाठी गद्धेगळ कोरले जाते.

वाई : येथील रविवार पेठेत परटाचा पार येथे १३ व्या शतकातील गद्धेगळ शिळा आढळली असल्याची माहिती इतिहास संशोधक (History Researcher) व मंदिर स्थापत्य अभ्यासक सौरभ जाधव यांनी दिली. ‘गद्धेगळ’ ही शिळा म्हणजे एक समजली जाणारी शापवाणी. हे शिळाशिल्प अधिक करून शिलाहार व यादव यांच्या राजवटीत कोरण्यात आली आहेत.

एखाद्या राजाने दान दिलेली जमीन कोणी बळकावून घेऊ नये आणि ती बळकावून घेऊन राजाज्ञा मोडली, तर त्याची गय करणार नाही, हे दर्शविण्यासाठी गद्धेगळ कोरले जाते. कोणी दिलेल्या दानाचा दुरुपयोग केला किंवा नियम मोडला, तर काय शिक्षा होईल, हे सांगणारे हे शिळाशिल्प आहे. त्याच्या वरच्या बाजूस सूर्य-चंद्र, मध्ये कलश कोरलेला असतो.

जोपर्यंत सृष्टीवर चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत दान दिलेल्या राजाची कीर्ती आसमंतात कायम राहील, असा या सूर्य-चंद्राचा अर्थ होतो. प्रामुख्याने शिव मंदिराच्या आवारात गद्धेगळ पाहायला मिळते. एखाद्या राजाने नवीन गाव किंवा शहर वसवले असेल, तर त्या शहराची हद्द सुरू होते, त्याठिकाणी तसेच सरदाराला दान दिलेल्या जमिनीच्या हद्दीला लागून ही शिळा ठेवली जाते.

जुनी वाई म्हणजे...

वाईचा प्राचीन इतिहास (Ancient History) पाहिला तर स्कंद पुराणांतर्गत कृष्णा महात्म्यात वाईचा उल्लेख वैराजक्षेत्र असा आढळतो. विराटनगर म्हणून देखील वाईला ओळखले जाते. किवरा ओढ्याकाठी मिळालेले क्षुद्राष्म हत्यारे, वरवंटा, पाटा, खापरे हे निवडक अवशेष प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवते. किवरा ओढा म्हणजे आताचे रविवार पेठ येथील पूर्व बाजू. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की जुनी वाई हे आताचे रविवार पेठ.

वाईचा इतिहास हा जगासमोर यावा, या हेतूने संशोधन करीत आहोत. येथील मंदिरे, लेण्या, गडकिल्ले, वीरगळ, वाडे, समाधी या विषयावर संशोधन चालू आहे. यातून इतिहासाची अज्ञात पाने उलगडली जातील.

-सौरभ तात्यासाहेब जाधव, इतिहास संशोधक, मंदिर स्थापत्य अभ्यासक

भटकंती सह्याद्रीची परिवार, वाई ही संस्था गडकिल्ले संवर्धन व सामाजिक कार्यात सहभाग घेत असते. संस्था लवकरच येथे हेरिटेज वॉक सुरू करत आहे. यामध्ये परिसरातील, किल्ले, मंदिरे, घाट, वाडे, प्राचीन ट्रेड रूटचे नियोजन करत आहोत.

-रोहित शिवाजी मुंगसे, गडकिल्ले अभ्यासक वाई

मंदिराचे पुरावे मिळेनात..

वाई परिसरातील किल्ले आणि मंदिरे. हे किल्ले शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेली आहेत, तर मंदिरे ही यादव व पेशवे राजवटीतील आढळून आली आहेत. यामुळे ही गद्धेगळ १३ व्या शतकातील असण्याची दाट शक्यता आहे. एक शंका निर्माण होते, ती म्हणजे रविवार पेठ ही वाईची जुनी वस्ती आहे. इथे यादव राजवटीतील गद्धेगळ आढळून येत असेल, तर मग यादव राजवटीतील शिवमंदिर देखील इथे असले पाहिजे; पण तसे मंदिराचे पुरावे सध्या तरी रविवार पेठेत आढळून आले नाहीत. असेल तर ते कोणी पाडले असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT