सातारा

..अखेर दहा आंतरजातीय जाेडप्यांना ग्रामस्थांनी स्वीकारले

संजय शिंदे

सातारा : आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांच्या मृत्यूपश्‍चात होणाऱ्या धार्मिक विधीत सहभागी न होऊ देता घातलेल्या सामाजिक बहिष्काराला अंधारी (ता. जावळी) येथे आज मूठमाती देण्यात आली. बहिष्काराविरोधात मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेत अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि मेढा पोलिस दलाने संयुक्‍तपणे ग्रामस्थांचे प्रबोधन करत बहिष्काराच्या कृत्याला मूठमाती दिली.
 
कासपासून काही अंतरावर अंधारी गाव असून, गावाचे अर्थकारण मुंबईस्थित चाकरमान्यांवर आहे. या गावातील घरटी युवक व इतर जण मुंबई येथे विविध क्षेत्रात काम करतात. कामाच्या ठिकाणी मने जुळल्याने या गावातील दहा जणांनी गेल्या काही वर्षांत आंतरजातीय विवाह केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन झाल्यानंतर मुंबईस्थित अंधारीकर गावाच्या आसऱ्याला विसावले. गावी परतलेल्यांपैकी आंतरजातीय विवाह केलेल्यांना स्थानिक ग्रामस्थांनी दुय्यम वागणूक देणे सुरू केले. लग्न, इतर धार्मिक विधी तसेच अंत्यसंस्कार व इतर विधींपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात येऊ लागले. यासाठी त्या जोडप्यांवर सामुदायिक दबाव आणण्यात येत असे. हा प्रकार गावातील आंतरजातीय विवाह केलेल्या आणि त्यासाठी शासनाचा सन्मान मिळालेले चंद्रकांत शेलार यांच्या निदर्शनास आला. यापूर्वी शेलार यांनी सामाजिक बहिष्कार कायद्याविषयी वाचले होते.

`एसटी`च्या गाडीने जाऊ..’ हे गीत पाहिल्‍यावर नक्‍कीच वाटेल चला एसटीने 

या कायद्याविषयी त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या वागणुकीत फरक पडत नव्हता. यामुळे सरतेशेवटी त्याविषयी मेढा पोलिस ठाण्यात तसेच "अंनिस'कडे तक्रार केली. यानुसार पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार मेढ्याचे सहायक निरीक्षक निळकंठ राठोड व "अंनिस'च्या डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे, भगवान रणदिवे, प्रशांत जाधव यांनी बैठक सामाजिक बहिष्कार कायद्याविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. याचवेळी आंतरजातीय विवाह केलेल्या सहा जोडप्यांनी सामाजिक भेदभावाची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सरपंचांनी पुढाकार घेऊन येथून पुढे अशा घटना गावात होणार नसल्याचा निर्धार केला.

मानसिकता सकारात्मक हवी, कोरोना तुमचे काहाही बिघडवू शकत नाही : इनामदार

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT