सातारा

केंद्राच्या वन्यजीव नियंत्रण समितीवर सातारचा दबदबा; पर्यावरण अभ्यासक भाटे, खामकरांची सदस्यपदी नियुक्ती

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे व नाना खामकर यांची केंद्राच्या वन्यजीव अपराध नियंत्रण समितीवर सदस्यपदी नेमणूक झाली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाअंतर्गत त्या समितीचे काम चालते. 

वन्यजीव तसेच वन्यजीव अवयवांची वाढती तस्करी व हत्या ह्याला आळा बसावा, ह्यासाठी ही समिती कार्य करते. पश्चिम घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची अवैधरित्या शिकार होते. तसेच कासव, मांडूळ, सर्प, सर्प विष, खवले मांजर, नख्या, वन्यजीव दात, कातडे आदींची तस्करी होत असते. त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या समितीवर श्री. भाटे व खामकर यांची निवड झाली आहे. 

जिल्ह्यात खऱ्या-खोट्या वाघ्नख्यांचे लॉकेट करून घालण्याची पद्धत रूढ होत आहे, तसेच घरात जिवंत कासव पाळण्याचे प्रमाण वाढत आहे. वन्यजीवांचे कातडे, शिंग शोभेच्या वस्तू म्हणून वापरल्या जात आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारेही वन्यजीवांच्या अवयवांचा वापर करताना दिसत आहेत. स्थानिक वनविभाग, वन्यजीव विभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ह्या अवैध कृत्यांचा प्रतिबंध करण्यासाठी व जनजागरण करण्याचे म्हत्वाचे काम ह्या समितीला करावे लागणार आहे. २०१६ पासून भाटे व खामकर हे ह्या समितीवर प्रभावीपणे कार्यरत आहेत. पुन्हा एखादा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोवर सदस्य म्हणून पुन्हा मार्च 2022 पर्यंत त्यांना निवडले गेले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

Mumbai Indians ला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का! शतकवीर खेळाडूसह युवा ऑलराऊंडर IPL 2026 मधून बाहेर

SCROLL FOR NEXT