सातारा

..अखेर चुरशीला पूर्णविराम! किशोर धुमाळ एलसीबीचे नवे कारभारी

प्रवीण जाधव

सातारा : विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यापासून रिक्त असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) निरीक्षकपदी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे किशोर धुमाळ यांची नियुक्त झाली आहे. त्यांनी एलसीबीच्या कारभाऱ्यासाठी सुरू असलेल्या चुरशीला पूर्णविराम मिळाला आहे. 

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यकाळात सुरवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले; परंतु काही काळातच त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्या वेळी ते सोलापूर ग्रामीणमधून साताऱ्यात बदलून आले होते. मागील महिन्यात सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ सर्जेराव पाटील यांनी सोलापूर ग्रामीणची वाट धरली. तेव्हापासून एलसीबीचे निरीक्षकपद रिक्त आहे. अजयुकमार बन्सल यांनी पोलिस अधीक्षकपद स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील सोलापूरला गेले. जिल्ह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. अनेकांच्या माध्यमातून नेत्यांकडे शब्द टाकण्याची गळ घातली जात होती. त्याच पद्धतीने एलसीबीच्या कारभारपणासाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरून फिल्डिंग लागली होती. 

पूर्वीच्या कामाचे दाखले, ज्येष्ठता, जिल्ह्यातील अनुभव अशा विविध परिमाणांची कसोटी त्यासाठी लावली जात आहे. आपलाच माणूस असावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेही त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, लगेचच विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षकांची निवडही लांबणीवर पडली होती. या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेची मुदतही संपली आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या नियुक्‍त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अधिक्षकांनी तातडीने निर्णय घेत एलसीबीचे निरीक्षक म्हणून किशोर धुमाळ यांची नियुक्त केली आहे. गेल्या महिन्यापासून रखडलेल्या एलसीबीच्या कामकाजाला गती देण्याचे काम धुमाळ यांना करावे लागणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT