सातारा

ऑक्‍सिजन ग्रुपला यंत्रांचे पाठबळ; पालकमंत्र्यांकडून कौतुक

सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोनाग्रस्तांना बेड मिळेपर्यंत घरीच ऑक्‍सिजन लावायची वेळ आली, तर ते यंत्र तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी शहरातील 10 तरुण उद्योजक, व्यापाऱ्यांनी पुढे येत ऑक्‍सिजन ग्रुप तयार केला आहे. त्यांच्यामार्फत मोफत ऑक्‍सिजन यंत्रे वापरण्यासाठी देण्यात येतात. त्यांना पाठबळासाठी येथील कऱ्हाडची माणुसकी या ग्रुपने व अन्य दोन व्यापाऱ्यांनी पाच ऑक्‍सिजन यंत्रे नुकतीच ऑक्‍सिजन ग्रुपकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केली. या वेळी पालकमंत्र्यांनी या ग्रुपचे कौतुक केले. 

ऑक्‍सिजनअभावी जीव जाऊ नये, यासाठी शहरातील भूषण शाह, संदीप कोटणीस, ईश्वर जैन, राकेश शाह, अनुप शाह, राहुल सोनी, स्वप्नील शाह, राजू मुथा, सुरेश देढिया, शशिकांत मोरे (पलूस) यांनी ऑक्‍सिजन यंत्रे स्वखर्चाने विकत घेतली. त्याद्वारे धाप लागलेल्या रुग्णांना विनामूल्य ऑक्‍सिजन यंत्रे देण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यांना पाठबळ मिळावे, यासाठी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व शहरातील दानशुरांनी सुरू केलेल्या कऱ्हाडची माणुसकी या ग्रुपनेही तीन ऑक्‍सिजन यंत्रे नुकतीच ग्रुपकडे सुपूर्द केली. 

इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपअधीक्षक गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह कऱ्हाडची माणुसकी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री पाटील यांनी ग्रुपच्या कामाचे कौतुक करून समाजातील दानशुरांना अशा सत्कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. संदीप कोटणीस यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक सलीम मुजावर व सदस्यांनी स्वागत केले. भूषण शाह यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT