Enthusiasm of devotees in Pratipandharpur Karharnaga 
सातारा

Ashadhi wari 2022 : प्रतिपंढरपूर करहरनगरीत भाविकांच्या उत्साहाला उधाण

टाळम्रदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला

महेश बारटक्के

कुडाळ - जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र प्रतिपंढरपूर करहर नगरीत दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वैष्णवांचा मेळा जमला होता. टाळम्रदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासुनच रांग लागली होती. त्यातच पावसानेही उघडीप दिल्याने वारकर्यांसह भाविकांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. आजपर्यंतच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढत हजारो भाविकांनी आज विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेत आषाढीचा सोहळा दिमाखात व जल्लोषात पार पाडला.

सकाळी सात वाजता सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार शशिकांत शिंदे त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. वैशाली शिंदे, यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. शेतकर्यांची आर्थिक प्रगती व्हावी. तालुक्यातील सर्व जनतेला सुखसम्रुध्दी आणि उत्तम आरोग्य लाभावे असे साकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी याप्रसंगी विठुरायाला घातले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे तहसीलदार राजेंद्र पोळ, सरपंच सर्जेराव यादव, आदी मान्यवर उपस्थित होते.

सलग दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भाव या पार्श्भूमीवर सर्व उत्सव सोहळे साजरे झाले नव्हते. त्यामुळे प्रती पंढरपूर करहर नगरीतील विठोबाचे दर्शनही सलग दोन वर्षानंतर आजच भाविकांना मिळणार होते. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह भरून आला होता. आज सकाळ पासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून करहर नगरीत भाविक मोठ्या संख्य़ेने दाखल झाले होते. ज्यांना आषाढीसाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे विठ्ठल भक्त प्रतीपंढरपूर करहर नगरी मध्ये येवून आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेवून जीवनाचे सार्थक झाले, असे मानतात.

जावळी सहकारी बँकेचे संस्थापक ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीच्या विठूमाऊलीचा लौकिक प्रतिपंढरपूर म्हणुन झाला. त्यांनी सुरु केलेल्या आदर्श परंपरे प्रमाणे महाराजांचे जन्म गाव असलेल्या दांडेघर पासुन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळयाला सुरुवात झाली. या सोहळ्यात तालुक्यातील अनेक वारकरी दिंड्या पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या. हा दिंडी सोहळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या बेलोशी या गावी आल्यानंतर महाराजांच्या समाधी समोर वारकर्यांनी किर्तन भजन केले. त्यांनंतर प्रतिपंढरपूर करहरच्या दिशेने दिंड्यांचे प्रस्थान झाले.

टाळम्रदुंगाच्या गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकर्यांच्या भक्ती रसाचा महापूर यानिमित्ताने लोटला होता. महुकुंडी येथे माऊलींच्या अश्वाचा रिंगण सोहळाही संपन्न झाला. हा दिंडी सोहळ्यात महु, दापवडी, रांजणी, वहागाव, विवर, कावडी, हातगेघर, पिंपळी अशा विविध गावांतुन संत ज्ञानेश्वर, तुकाराम, अशा संत महंतांच्या पालख्या घेऊन हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते.

सर्व दिंड्यांचे प्रतिपंढरपूर करहर येथे दुपारी चार वाजता आगमन झाले त्यावेळी अक्षरश: भक्तीरसाला महापूर आला होता अशातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सैारभ शिंदे आदींनीही टाळ मृदगांच्या तालावर तल्लीन होऊन दिंडीत सहभाग घेतला, .यावेळी दिंडीमधील महिलांनी फुगड्या खेळल्या तर तरुणाई सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये सामील झाली होती. हा सोहळा एक तास उत्साहात सुरू होता. न भूतो न भविष्यते असा हा सोहळा करहर नगरी मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. यामध्ये अभूतपूर्व अशी गर्दी पहावयास मिळाली. हा सोहळा नयनांचे पारणे फेडणारा असाच होता. न भूतो न भविष्यते असा हा सोहळा करहर नगरी मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. आलेल्या वारकर्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने व सामाजिक व सहकारी संस्थांकडून तसेच विविध पक्षांच्या कार्यकत्यांकडून फराळाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT