Poison Sakal
सातारा

रांजणीतील धरणग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न

बरडला जमीन ताब्यासाठी नकार दिल्याने विष घेतले

सकाळ वृत्तसेवा

भिलार - शासनाने दिलेली पुनर्वसनातील हक्काची जमीन मूळ मालक देत नसल्याने रांजणी (ता. जावळी) येथील धरणग्रस्ताने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बरडमध्ये (ता. फलटण) विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने जावळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल दगडू रांजणे असे या धरणग्रस्ताचे नाव असून, त्यांच्यावर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की महू धरणात बाधित असणाऱ्या रांजणी गावातील काही खातेदारांना अद्यापही जमिनींचा मोबदला मिळाला नाही. धरणाची वाटचाल पूर्णत्वाकडे चालली असताना या गावातील अनेकांना अद्यापही जमिनी ताब्यात मिळालेल्या नाहीत. विठ्ठल रांजणे यांना फलटण तालुक्यातील बरड येथे जमीन मिळाली असून, संबंधित जमीन रांजणे यांना ताब्यात देण्यास मूळ मालक नकार देत आहेत. रांजणे व त्यांचे कुटुंबीय आज सकाळी जमीन कसण्यासाठी गेले असताना त्यांना त्या ठिकाणी मूळ मालकांनी अडथळा आणत काठ्यांनी धाक दाखवत हाकलून देण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी रांजणे यांनी जागेवरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या वडिलोपार्जित जमिनी धरणासाठी देऊन त्यापोटी हक्काचा मोबदला असणारी जमिनीच जर मिळत नसेल तर जागून काय फायदा हा विचार करून रांजणे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रांजणे यांच्यावर साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT