सातारा

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथ-माता जोगेश्वरी वाघावर स्वार; भाविकांचे वेधले लक्ष

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला रुप देण्यात येते. देवाची ही विविध रुपे पाहण्यासाठी युवक, युवती, ग्रामस्थांसह अबालवृद्ध देखील दररोज न चुकता मंदिरामध्ये येतात. यावर्षी मंदिरात श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी वाघावर स्वार असल्याचे पोषाखाव्दारे रुप देण्यात आले आहे.

बारा दिवस मंदिरामध्ये भक्तीमय वातावरणात कीर्तन, प्रवचन, काकड आरती व धार्मिक विधी केले जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळूनच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्व विधी केले जातात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे बंद

Ausa News : औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी डॉ. अफसर शेख

SSC Exam Result : स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

SCROLL FOR NEXT