सातारा

बारा ज्योतिर्लिंगसह गणपती कार्तिकी दर्शन; श्री यमाई देवीची पूजा

शशिकांत धुमाळ

औंध (जि. सातारा) : श्री यमाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने आज (सोमवार) बारा ज्योतिर्लिंग दर्शनासह गणपती कार्तिकी दर्शन देखाव्या सोबत आकर्षक पूजा बांधण्यात आलेली आहे. येथील ग्रामनिवासिनी ,मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदाचा उत्सव 26 आक्टोबर अखेर औंध येथे फक्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे.

कोरोनामुळे सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम यंदा होणार नसल्याची माहिती श्री यमाईदेवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. तसेच शासनाच्या नियमानुसार मंदिर देखील बंद राहणार आहे. आज (साेमवार) सायंकाळी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम होणार आहेत.

औंध : श्री यमाई देवीची समुद्र मंथन स्वरुपातील पूजा

आज (साेमवार) मूळपीठ निवासिनी श्री यमाई देवीच्या पावित्र्य, सात्विकता, शुचिर्भूतता, सुसंस्कार , बुद्धिमत्ता व सौंदर्याचे प्रतीक असणाऱ्या "पांढऱ्या " रंगाच्या सोबत मनमोहक पूजा बांधण्यात आलेली हाेती. उद्या (मंगळवार ता.20) देवीच्या पाटयापूजन,देवीची ओटीपूजन,मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीचे ओटीभरण तसेच महानैवेद्य, महाआरती हे कार्यक्रम होणार आहेत.

जोतिबाची तिसऱ्या दिवशी पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा  

औंध संस्थानमध्ये दरवर्षी ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो मात्र यंदा महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संस्थानच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम वगळून फक्त धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सव साधेपणाने होत आहे.

पन्हाळ्यावरील नागांना दर्शन रूपात श्री अंबाबाईची पूजा 

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ मजुरांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT