ayush gram yojana satara chore ayurved clinic selected marathi news Sakal
सातारा

Satara News : चोरे आयुर्वेद दवाखान्याची राज्यस्तरावर निवड; सातारा जिल्ह्यातील पहिलाच दवाखाना

राष्ट्रीय आयुष अभियानाच्या आयुष सेवा उपक्रम अंतर्गत चोरे येथे आयुर्वेदीक दवाखाना सुरु करण्यात आला

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राष्ट्रीय आयुष अभियानाच्या आयुष सेवा उपक्रम अंतर्गत आयुष ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील १७ आयुर्वेद दवाखान्यांपैकी चोरे येथील दवाखान्याची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातून केवळ नऊ दवाखान्यांची निवड झाली. त्यात चोरेतील दवाखान्याचा समावेश आहे.

राष्ट्रीय आयुष अभियानाच्या आयुष सेवा उपक्रम अंतर्गत चोरे येथे आयुर्वेदीक दवाखाना सुरु करण्यात आला आहे. नुकतेच या दवाखान्याचे एनएबीएच नामांकानासाठीही नुल्यमापन करण्यात आले आहेत. या आयुष ग्राम उपक्रमात निवड होण्यासाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार, इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृशल जाधव, डॉ. स्वाती यादव यांच्या मार्गदर्शनातून आयुष आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका कांबळे यांनी या दवाखान्यामध्ये आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी विशेष आरोग्य शिबीरे घेतली.

आयुर्वेद निदान, उपचार, विद्धकर्म, अग्नीकर्म, आयुर्वेद वनौषधी उद्यानामधून लोकांना त्याची ओळख करुन देवुन उपयुक्तता पटवून दिली. येत्या तीन वर्षांमध्ये आयुष ग्राम योजनेच्या माध्यमातून चोरे गावातील आयुर्वेद दवाखान्यात अनेक आयुर्वेद अभिनव उपक्रम राबवले जातील असे वैद्यकीय अधिकारी डॉ. काबळे यांनी सांगीतले.

`` जिल्ह्यातील आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र चोरे याची राज्यस्तरावरील आयुष ग्राम या उपक्रमासाठी निवड होणे ही आरोग्य विभागासाठी नक्कीच कौतुकाची बाब आहे.´´

- डॉ. महेश खलिपे,जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा.

" आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र चोरे याची आयुष ग्राम या अभिनव उपक्रमासाठी निवड होणे ही कामाची एक उत्तम संधी आहेत. कमी मनुष्यबळात या आरोग्यसंस्थेने हे यश मिळवले आहे.भविष्यात येथे अनेक अभिनव उपक्रम राबवून येथील रुग्णांना अधिक आयुष आरोग्य सेवा देणेसाठी प्रयत्न केले जातील."

- डॉ. मिथुन पवार,जिल्हा आयुष अधिकारी, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT