सातारा

शिक्षकाने राबविलेल्या "स्टोरी ऑन फोन' उपक्रमास जागतिक पुरस्कार

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा)  : क्रिएटिव्हिटी अँड इन्क्‍लुझिव्ह इनोव्हेशन ऍवार्डस (एचबीएनसीआरआयआयए) 2020 या प्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम 11 विजेत्यांमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या विजयनगर (पर्यंती) (ता. माण) प्राथमिक शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांची निवड झाली आहे.
 
हनी बी नेटवर्क ही गुजरात येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणारी संस्था आहे. त्यांनी जगभरातील विविध संशोधन व नावीन्यपूर्ण कल्पना, यासाठी ही जागतिक स्पर्धा आयोजित केली होती. तळागाळातील, कल्पनेतील नावीन्यपूर्ण गोष्टींना आंतरराष्ट्रीय मान्यता देणे आणि सामाजिक गरजा पूर्ण करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. या पुरस्कारासाठी पालक, शिक्षक, व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा औपचारिक किंवा अनौपचारिक क्षेत्रातील 87 देशांतील 2500 जणांनी प्रस्ताव सादर केले होते. प्राथमिक टप्प्यावर प्रख्यात विद्वान, अभ्यासकांनी प्रस्तावाची तपासणी केली. त्यानंतर तज्ज्ञ मंडळींनी प्रस्तावांचे पुनरावलोकन केले. त्यामध्ये कोविड काळात श्री. जाधव यांनी राबवलेला "स्टोरी ऑन फोन' या उपक्रमाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. श्री. जाधव यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, "गुगल'ने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

काय सांगता! 1972 पासून गुंडेवाडीची निवडणुकच झाली नाही

श्री. जाधव हे विजयनगर (पर्यंती) शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत 40 विद्यार्थी आहेत. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात सकाळी ते मुलांना गोष्टी सांगत व संध्याकाळी मूल गोष्टी सांगत असत. आता त्यांनी अभ्यासक्रम गोष्टीरूपात तयार केल्याने अधिक मनोरंजक झाला आहे. त्यानंतर त्यांनी मुलांना फोनवरील संभाषणात सांगितलेल्या गोष्टी लिहायला सांगितल्या. दीड महिन्यानंतर मुले गोष्टी लिहिण्यात अन्‌ सांगण्यात तरबेज झाली. नंतर त्यांनी एक पाऊल पुढे टाकत मुलांना गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी सांगितल्या. सध्या त्यांनी तयार केलेल्या अशा 500 गोष्टी गुगल ड्राईव्हवर उपलब्ध आहेत.

माझ्या वाईटाला कोणी जाऊ नये - पालकमंत्री सतेज पाटील

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT