सातारा

नरकासुराने ठेवली आठ महिने मंदिरे बंद; बंडातात्यांचा ठाकरेंवर घणाघात

उमेश बांबरे

सातारा : देशातील सर्व मंदिरे खुली असताना महाराष्ट्रातील मंदिरे बंद ठेऊन आपल्या नरकासुराने गेली आठ महिने कृष्णरूपी विठ्ठलाला सत्यभामा रूक्‍मिणीसह बंदीवासात टाकले आहे. असे असताना आपण दिवाळीत कोणता आनंद साजरा करता, असा प्रश्न उपस्थित करून नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात हिंदूंचा कैवारी आहे. तो इच्छा असूनही मंदिरे खुली करू शकत नाही. त्यामुळे यावेळी आपण दिवाळी साजरी न करता यांच्या नावाने शिमगा साजरा करा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. 

यासंदर्भात सोशल मीडियावर श्री. कराडकर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो. पण, संपूर्ण भारतातील सर्व मंदिरे खुली असताना महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेली आठ महिने बंद ठेवली आहे. कृष्णरूपी विठ्ठलाला सत्यभामा रूक्‍मिणीसह बंदीवासात टाकले असताना आपण कोणता आनंद साजरा करणार आहात. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका व वणीची सप्तश्रुंगी बंदिस्त असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन आपण करणार आहोत. 

बळीराजा असूर म्हणून वामनाने त्याचे राज्य घेतले. येथे असुरांचे राज्य असताना कसली बलिप्रतिपदा साजरी करता, असा प्रश्न उपस्थित करून बंडातात्या म्हणाले, राज्यात दारूची दुकाने, भाजी मंडई, हॉटेल्स, ढाबे, विवाह, पार्ट्यां व पार्टी मिटिंग सर्रास सुरु आहेत. मात्र, मंदिरे, वाऱ्या, भजन, सप्ताहांना पूर्ण बंदी आहे. तरीही आपण दिवाळी साजरी करणार आहात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात हिंदूंचा कैवारी आहे. तो इच्छा असूनही मंदिरे खुली करू शकत नाही. त्यामुळे दिवाळी साजरी न करता त्यांच्या नावाने शिमगा साजरा करा. अंघोळ करायचीच असेल तर त्यांच्या नावाने व गोड खायचेच असेल तर त्यांच्या चौदाव्याच्या नावाने खा, असे आवाहनही बंडातात्यांनी केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT