Udayanraje Bhosale esakal
सातारा

भाजपच्या उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये स्थान?

उमेश बांबरे

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये कोणालाही डावललेलं नाही.

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) राष्ट्रवादीच्या (NCP) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये कोणालाही डावललेले नाही. यासंदर्भातील बैठकीत आम्ही केवळ दहा ते 11 जागांविषयीच चर्चा केली. पॅनेलचा निर्णय सर्व नेतेमंडळी बसून घेतील, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना पॅनेलमध्ये सामावून घेणार का, या प्रश्नावर त्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र बसून कोणाला घ्यायचे, कोणाला नाही तसेच पॅनेल कसे करायचे, याबाबत निर्णय घेऊ, असे सांगत सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी उदयनराजेंना सामावून घेण्याच्या मुद्द्याला बगल दिली.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मी स्वतः तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे यांसह आम्ही सर्व प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पॅनेलच्याबाबतीत आम्ही नंतर निर्णय घेणार आहोत. काही उमेदवारांना डावलले गेले आहे का, भाजपला विचारात घेतले नाही, असे काहीही झालेले नाही. बैठकीत चर्चा झाली. कोण कुठे असावे, ११ जागांबाबत चर्चा झाली. त्यानंतर दहा जागांबाबत चर्चा झाली. यामध्ये अद्याप कोणाबाबतही निर्णय घेतलेला नाही. पॅनेलचे काहीही नाव ठरलेले नाही.’’ खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेणार का, याविषयी बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘आज तीन वाजेपर्यंत अर्जाची दाखल प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर आम्ही कोणाला घ्यायचे की नाही, तसेच पॅनेलच्याबाबतीत आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.’’

बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा अर्ज आहे. त्यांनी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी आग्रह धरला आहे. पण, आम्ही त्यांना बँका, पतसंस्था मतदारसंघातून निवडणूक लढावी, अशी विनंती केली आहे. पण, ते याच मतदारसंघातून आग्रही आहेत. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या माध्यमातून सुरू असून, त्यांची समजूत काढली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT