Bapurao Pisal esakal
सातारा

शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव

शशिकांत धुमाळ

निमसोड (सातारा) : चोराडे (ता. खटाव) येथील बापुराव कृष्णा पिसाळ उर्फ बापू ड्रायवर यांनी बांधलेल्या नूतन बंगल्यास '86032 ची कृपा' नाव देऊन निष्ठा, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करून शेतकरी बांधवांना आदर्श घालून दिला आहे. चोराडे येथील ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी बापुराव कृष्णा पिसाळ (Farmer Bapurao Pisal) उर्फ बापू ड्रायवर यांनी गेली वीस वर्षे ऊस पिकाची लागवड करीत आहेत. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने 1996 साली प्रसारित केलेल्या 'को 86032' या उसाच्या वाणाने त्यांची चांगलीच प्रगती झाली आहे. (Bapurao Pisal From Chorade Has Named The Bungalow As 86032 Sugarcane bam92)

चोराडेतील ऊस उत्पादक शेतकरी बापुराव पिसाळ हे गेली वीस वर्षे ऊस पिकाची लागवड करीत आहेत.

दरवर्षी त्यांचा चार ते पाच एकर उसामध्ये अंदाजे 400 ते 450 टनापेक्षा अधिक उत्पादन मिळते. दुष्काळी खटाव तालुक्यात विहीर बागायती क्षेत्रावरती ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे सुनियोजन, सुयोग्य  सेंद्रिय खतांचा वापर, आणि बियाण्यासाठी को 86032 वाणाच्या विश्वासहर्तेमुळेच बापू ड्रायवर यांना सरासरी एकरी 90 टनापेक्षा जास्त उतार मिळत आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवरती अवलंबून असल्याने त्यांनी आपल्या घरातील मुलांच्या लग्नाचा खर्च, तसेच विहीर व शेती दुरुस्तीसाठीचा खर्च याचे सुनियोजन करून सुमारे 1500 स्क्वेअर फुटाचा टुमदार बंगला शेतामध्ये नुकताच बांधला आहे. त्यांची ऊस पिकाबाबतची निष्ठा, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या बंगल्यास गड-किल्ले, आई-वडील, देव-देवतांची नावे  न देता, ज्या ऊस उत्पादनामुळे आपली उत्तुंग प्रगती झाली त्या उसाच्या वाणाचे 'को- 86032 ची कृपा' असे नाव दिले आहे. तसेच बंगल्या वरती उसाची चित्रेही रेखाटलेली आहेत.

बंगल्याला  '86032 ची कृपा' या दिलेल्या हटके नावामुळे परिसरात व सोशल मीडियाद्वारे झालेल्या प्रचंड लाईकद्वारे खटाव येथील कृषी विभाग व ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, मंडल कृषी अधिकारी दाभाडे, भूमाता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पिसाळ, ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह आदींनी 'बापू ड्रायवर' यांचा शाल, श्रीफळ, फेटा, ऊस मार्गदर्शन पुस्तिका व विद्यापीठाची कृषी दैनंदिनी देऊन नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला.

Bungalow 86032

प्रतिकूल परिस्थितीत केलेले सुनियोजन, प्रामाणिक कष्ट आणि ऊसावरील निस्सीम प्रेम यामुळेच बंगला बांधण्याचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणूनच, '86032 ची कृपा' हा आम्ही केलेला योग्य सन्मान अभिमानास्पदच आहे.

-बापुराव पिसाळ, ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी, चोराडे

Bapurao Pisal From Chorade Has Named The Bungalow As 86032 Sugarcane bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT